भाजपा सरकार शेतकरी विरोधी – शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी रोहित पवारांना जामखेड तालुक्यात उच्चांकी मताधिक्य देणार – अँड मयुर डोके

0
44

जामखेड न्युज ———

भाजपा सरकार शेतकरी विरोधी – शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी

रोहित पवारांना जामखेड तालुक्यात उच्चांकी मताधिक्य देणार – अँड मयुर डोके

भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सोयाबीन आठ ते नऊ हजार रुपये क्विंटल रूपये होते. आता ते चार हजार रुपये च्या आसपास आहे. तसेच ठाकरे सरकारची कर्जमाफी सरसकट होती तर फडणवीस सरकारची कर्जमाफी पंचवीस अटी होत्या या सर्व बाबी पाहता भाजपा सरकार शेतकरी विरोधी आहे असे दिसते असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी व्यक्त केले.

जामखेड तालुक्याच्या सर्वागीण विकासासाठी
तालुक्यातून रोहित पवारांना उच्चांकी मताधिक्य देणार आहे यासाठी शिवसैनिक घराघरात जाऊन रोहित पवारांचा विकास सांगणार आहोत. तालुक्यात रोहित पवारांना उच्चांकी मताधिक्य असेल असे शिवसेना तालुकाप्रमुख अँड मयुर डोके यांनी सांगितले.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची रोहित पवार यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु विरोधकांनी ते प्रचाराला येऊ नयेत म्हणून विघ्न आणले असेही सांगितले.
यावेळी महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, सहसंपर्क प्रमुख जगदीश चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कर्जत शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम यादव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, मंगेश आजबे,
शिवसेना तालुकाप्रमुख अँड मयुर डोके, शहरप्रमुख गणेश काळे, रमेश आजबे, अर्चनाताई राळेभात, सुर्यकांत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता वारे, राजेंद्र कोठारी, कैलास हजारे, विजयसिंह गोलेकर, शहाजी राळेभात, बिभीषण धनवडे, आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा, माजी सभापती राजश्री मोरे, सागर कोल्हे, विक्री घायतडक, सुनील उगले, प्रशांत राळेभात, सुनील लोंढे, संपत राळेभात, वसिम सय्यद, सुंदरदास बिरंगळ यांच्या सह अनेक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना जिल्हाप्रमुख व संपर्क प्रमुख जामखेड शहरासह तालुक्यातील अनेक गावात भेटी देत तालुक्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला व आमदार रोहित पवार यांच्या मताधिक्यासाठी जोरदार फिल्डिंग लावलेली दिसली. यावेळीजिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, विधानसभा संपर्कप्रमुख जगदीश चौधरी, सुनील तांबे, तालुकाप्रमुख अँड मयुर डोके, शहर प्रमुख गणेश काळे, ज्येष्ठ शिवसैनिक व तालुका उपप्रमुख मोहन जाधव, गोकुळ नेटके, उद्योजक धनंजय नेटके, रावसाहेब नेटके, भारत पवार, परसराम रेडे यांच्या सह अनेक शिवसैनिक हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here