जामखेड न्युज——
प्रा. राम शिंदे यांच्या आर्थिक पाठबळाच्या मागणीवर रोहित पवार यांचा पलटवार
तुमच्या प्रॉपर्टी कोठे कोठे आहेत जनतेला माहीत आहे. महागड्या गाड्यात फिरतात राम शिंदे यांचा सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंट – आ. रोहीत पवार
आमदार प्रा राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीसाठी आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून मागणी केली सोशल मीडियावर ती पोस्ट व्हायरल झाली याबाबत आमदार रोहित पवार यांनी आमदार प्रा राम शिंदे यांचा खरपूस समाचार घेतला ते म्हणाले की. निवडणूक विवरणपत्र भरताना आपण आपली संपत्ती जाहीर केली आहे. आपण किती कोटी रुपयांच्या बंगल्यात राहतात महागड्या गाडीत फिरतात मग आपण गरीब कसे पक्षाकडून आलेला निधी काय करतात असा सवाल उपस्थित केला.
मला अर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. माझ्यावर प्रेम करणा-यांनी माझ्या अकाउंट वर पैसे टाकून मला अर्थिक मदत करावी अशी पोस्ट आ. राम शिंदे यांनी सोशल मीडियावर टाकली या पोस्टला यावर बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले,
आ. राम शिंदे तुमच्या प्रॉपर्टी कोठे कोठे आहे हे जनतेला माहीत आहे. तुमची एवढी संपत्ती कोठून आली असा प्रश्न नागरिकात विचारला जात आहे. निवडणूक खर्चात करोडोची संपत्ती दाखवतात, महागड्या गाड्यात फिरतात. निवडणुकी साठी ५० लाख रूपये लागतात तुम्हाला खर्च करायचा असेल तर करा नाही तर करू नका लोकांना मते द्यायची असेल तर ते तुम्हाला देतील. निवडणूक हातची निघून गेली की असा स्टंट निर्माण केला जातो. लोकांना पैसे मागून सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी त्यांच्या डोक्याने हा विचार करायला पाहीजे हा सल्ला त्यांच्या कन्सल्टंटने दिला असावा असा खोचक टोला आ. रोहीत पवार यांनी आ.राम शिंदे यांच्या पोस्टवर केला.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची रोहित पवार यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु विरोधकांनी ते प्रचाराला येऊ नयेत म्हणून विघ्न आणले असेही सांगितले.
यावेळी महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, सहसंपर्क प्रमुख जगदीश चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कर्जत शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम यादव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, मंगेश आजबे,
शिवसेना तालुकाप्रमुख अँड मयुर डोके, शहरप्रमुख गणेश काळे, रमेश आजबे, अर्चनाताई राळेभात, सुर्यकांत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता वारे, राजेंद्र कोठारी, कैलास हजारे, विजयसिंह गोलेकर, शहाजी राळेभात, बिभीषण धनवडे, आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा, माजी सभापती राजश्री मोरे, सागर कोल्हे, विक्री घायतडक, सुनील उगले, प्रशांत राळेभात, सुनील लोंढे, संपत राळेभात, वसिम सय्यद, सुंदरदास बिरंगळ यांच्या सह अनेक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की,
कोरोना माहामारी तसेच लंपी आजाराच्या वेळी सध्या कर्जत जामखेड मतदारसंघात भुमीपुत्र म्हणून मिरवणारे ढोंगी भुमीपुत्र कोणत्या घरी होते. आपण कोरोना काळात लोकांना दिलासा देण्यासाठी कोविड सेंटर उभारून उपचार केले तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण कर्जत जामखेड मतदारसंघात केले आपण लोकांना दिलासा देत होतो आणी स्वत:ला भुमीपुत्र म्हणून घेणारा ढोंगी भुमीपुत्र कोणत्या घरी होते.
आपण विकासाचे राजकारण करत आहोत. विरोधक ढोंगी पणा करत आहेत. विरोधकांना त्यांनी विकासाबाबत समोरासमोर येण्याचे आव्हान केले. तसेच भाजपा प्रवेश रात्रीचे का होतात असा सवाल उपस्थित केला. मी पाच वर्षे तुमची इनामे इतबारे सेवा केली आहे. मी मोठ्या मताधिक्याने निवडून येणार व सरकारही येणार शेतीसाठी पाणी आणणारच तसेच एमआयडीसी सुरू करणारच असे सांगितले. याचबरोबर सध्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दहशत सुरू आहे तिचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही, विरोधक साडेचार वर्षे घरात बसतात व सहा महिनेच लोकांमध्ये येतात असे पवार यांनी सांगितले.