जामखेड न्युज——
दिल्ली येथे पार पडलेल्या यंग स्टार क्रिकेट लीग स्पर्धेत तांबे सरांच्या ओशन क्रिकेट क्लबची मुले चमकली.
अंडर फोर्टीन स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात विजयाला गवसणी
भारताच्या राजधानी दिल्ली येथे पार पडलेल्या अंडर फोर्टीन यंग स्टार क्रिकेट लीग लेदर बॉल टूर्नामेंट या नॅशनल क्रिकेट लीग मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून ओषण क्रिकेट ॲकॅडमी येथील मुलांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये विजेते पण मिळवलं. सविस्तर वृत्त असे की जुलै महिन्यामध्ये पूर्ण भारतातून सिलेक्शन घेऊन काही ठराविक विद्यार्थ्यांना दिल्ली येथे खेळण्याची संधी यंग स्टार क्रिकेट लीग यांच्याकडून देण्यात आली.
या लीगमध्ये संपूर्ण भारतातून नवनवीन टॅलेंटेड मुले सहभागी झाली होती. यामध्ये बीड व जामखेड येथील ओशन क्रिकेट क्लब ची मुले निवडली गेली.
प्रथमतः ओशन क्रिकेट क्लब चा स्टार बॉलर आदित्य जायभाय याची पँथर्स टीमचा कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली.
या टीम मध्ये कार्तिक डोंगरे सार्थक गोपाळघरे यांची निवड करण्यात आली होती. प्रथम सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारून गोलंदाजीचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये आदित्य साहेब आहे याने तीन विकेट घेतल्या.
कार्तिक डोंगरे यांनी एक विकेट घेतली. तसेच प्रथमेश कुलकर्णी या स्पिनरने तीन विकेट घेण्याचा मान मिळावाला. लेपर्ड संघाने 160 धावा चव्हाण ईश्वर मध्ये ठेवले यामध्ये कश्मीर येथील मुंतशीर याने उत्कृष्ट फलंदाजी केली.
त्याला सुमित दुबे याने उत्कृष्ट साथ देत धावांचा डोंगर उभा केला. याला प्रत्युत्तर देताना ओपनिंग जोडी रणक सिंग (76)व पियुष (३8) उत्तर प्रदेश यांनी जबरदस्त प्रदर्शन करत मॅच एक हाती जिंकून दिला.
दुसऱ्या मॅच मध्ये कॅप्टन आदित्य जायभाय यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारून चा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रथमेश कुलकर्णी यांनी हा निर्णय सार्थ ठरवत चार विकेट घेतल्या. तसेच आदित्य साहेब आहे व कार्तिक डोंगरे यांनी एक एक विकेट घेतली. व लेपर्ड संघाचा डाव 98 धावांमध्येच थांबवण्यात यश मिळवले.
प्रत्युत्तर दाखल देसाई जो की गुजरात येथून आला होता त्याने नाबाद 66 राणाची योगदान देऊन मॅच जिंकली. फायनल मॅच मध्ये आदित्य साहेबांनी बॅटिंगचा निर्णय घेतला. बॅटिंग चा क्रमांक मध्ये झालेल्या बदलामुळे संघ 78 धावांमध्ये गार झाला. त्यानंतर बॅटिंगला उतरलेल्या लेपर्ड संघाने चांगली सुरुवात करताना एक विकेट 25 धाव अशी धावसंख्या उभारली.
त्यानंतर गोलंदाजी झालेल्या कार्तिक डोंगरे यांनी महत्त्वपूर्ण मुंतशिर विकेट घेतली. आदित्य यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत चार विकेट घेतल्या तसेच मॅच जिंकून दिला. झालेल्या सर्व मॅचेस मध्ये विजय मिळवून आंसर टीमने वायसीएलच्या अंडर फोर्टीन ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
या संघात आदित्य जायभाय, रणक सिंग, सुमित दुबे, कार्तिक डोंगरे, गोपाळ घरे,धिरेंद्रा नायक, नील, अर्णव दुबे तसेच आणि तीन खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंनी केलेले या प्रदर्शनाचे संपूर्ण देशामध्ये कौतुक होत आहे.