शिवनेरी अकॅडमी व नान्नज ग्रामस्थांतर्फे सैन्य भरती मार्गदर्शन शिबीर

0
261
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
नगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे ७ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२१ दरम्यान होणाऱ्या सैनिक भरतीसाठी, भरती पूर्वतयारी मार्गदर्शन व वजन, उंची अशा प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मार्गदर्शन शिबीरांचा तालुक्यातील तरूणांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन शिवनेरी अकॅडमीचे संचालक व कॅप्टन लक्ष्मण भोरे (सेवा निवृत्त) यांनी केले.
   जामखेड तालुक्यातील नान्नज येथे उद्या दि. २५ जूलै रोजी रविवार सकाळी ठीक ८ : ३० वाजता शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे  (सेवा निवृत्त) यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच महेंद्र मोहळकर व टिम ग्रामपंचायत यांनी जामखेड तालुक्यातील नान्नज ग्रामपंचायतच्या वतीने परिसरातील माहारुळी, पोतेवाडी, गुरेवाडी, वाघा, चोभेवाडी, राजेवाडी, धोंड पारगाव, बोर्ले, सर्व वाडी वस्ती वरील युवकांसाठी भरती पुर्व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबीरासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी हजर रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
        या शिबीरात आपण भरतीसाठी नेमके कोठे कमी पडतो, परीक्षा कशी असते, अभ्यास कसा करावा, नेमके काय पाहिले जाते, भरतीसाठी काय काय कागदपत्रे लागतात पात्रता काय असते या सर्व विषयावर योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. याचे नियोजन व आयोजन नान्नजचे  सरपंच महेंद्र मोहळकर यांनी केलेले आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांनी या करिअर मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
 तसेच यावेळी ज्या विद्यार्थ्यांना भरती साठी आवश्यक असणारे वजन उंची छाती तपासणी करायचे आहे. त्यासाठीही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. तरी तरूणांनी व पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच महेंद्र मोहळकर व शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here