Tuesday, April 14, 2026
Home शैक्षणिक बातम्या रस्ता सुरक्षा अभियान स्पर्धेचे निकाल जाहीर चित्रकला स्पर्धेत कन्या विद्यालयाची काव्या...

रस्ता सुरक्षा अभियान स्पर्धेचे निकाल जाहीर चित्रकला स्पर्धेत कन्या विद्यालयाची काव्या जगताप प्रथम तर निबंध स्पर्धेत ल. ना. होशिंग विद्यालयाचा अनन्य कामे प्रथम

0
52

जामखेड न्युज—–

रस्ता सुरक्षा अभियान स्पर्धेचे निकाल जाहीर

चित्रकला स्पर्धेत कन्या विद्यालयाची काव्या जगताप प्रथम

तर निबंध स्पर्धेत ल. ना. होशिंग विद्यालयाचा अनन्य कामे प्रथम

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मुलांमध्ये आणि नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम व सुरक्षेबाबत जागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय अहिल्यानगर यांच्या मार्फत चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने विनोद सगरे प्रादेशिक परिवहन अधिकारी अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद अ. नगर मधील सर्व शाळेत चित्रकला, निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात एक जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत करण्यात आले होते.

चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक काव्या आनंद जगताप कन्या विद्यालय जामखेड, द्वितीय क्रमांक आरोही जितेंद्र सरोदे, तृतीय क्रमांक ईशा अखिल तांबोळी यांनी पटकावले तसेच निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक ल. ना. होशिंग विद्यालयाचा अनन्य विवेक कामे, द्वितीय क्रमांक कन्या विद्यालय संचिता नितीन ढेरे, तृतीय क्रमांक ल. ना. होशिंग विद्यालयाची तन्वी विजय गवळी यांनी क्रमांक पटकावले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

आज कन्या विद्यालयात काव्या जगताप हिस प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देण्यात आले यावेळी चेतन दासनूर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, निलेश शिंदे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, सोमिनाथ शिंदे, नागेश विद्यालयाचे प्राचार्य बी.के. मडके, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भोर. आर. आर, पत्रकार सुदाम वराट, आबा जायगुडे, लटपटे डि व्हि, काव्या ची आई प्राजक्ता जगताप यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

प्रादेशिक परिवहन मंडळाच्या वतीने या स्पर्धा शाळा पातळीवर राबवल्या जातात, ज्यात वाहतूक चिन्हे, हेल्मेटचा वापर आणि सावधगिरीचे उपाय या विषयांवर चित्रे काढली जातात. 

रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देणे, अपघात कमी करणे आणि नियमांचे पालन करण्याचे महत्त्व सांगणे, ट्रॅफिक सिग्नलचे नियम आणि त्यांचे अर्थ। हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर, ‘गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळा’ सुरक्षित अंतर ठेवा’ अशा थीम होत्या. 

प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पोलीस विभाग यांच्या मार्फत १ जानेवारी ते ३१ जानेवारी या काळात चित्रकला, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!