जामखेड पोलीस स्टेशन मधील दहा कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार समारंभ

0
285
जामखेड प्रतिनिधी 
         जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
        जामखेड पोलीस स्टेशन मधील विविध पदांवर कार्यरत असलेल्या दहा पोलीस कर्मचार्‍यांची खात्यांतर्गत पदोन्नती झाल्याने आज दुपारी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बॅच लावून सत्कार करण्यात आला.
   विविध पदांवर कार्यरत असलेल्या व पदोन्नती मिळालेल्या दहा कर्मचार्‍यांमध्ये शिवाजी भोस पोलीस हवालदार ते सहायक फौजदार,  संजय लोखंडे ,रावसाहेब नागरगोजे, रमेश फुलमाली, भगवान पालवे पोलीस नाईक ते पोलीस हवालदार, अविनाश ढेरे ,राहुल हिंगसे ,अझरुद्दीन सय्यद, बाळासाहेब तागड , मुख्तार कुरेशी पोलीस शिपाई ते पोलीस नाईक या  कर्मचाऱ्यांना  पदोन्नती मिळाल्याने  जामखेड पोलीस ठाण्यात आज आनंदाचे वातावरण
दिसुन आले त्यांचा गौरवही करण्यात आला .
जामखेड पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक म्हणुन संभाजीराव गायकवाड यांनी पोलीस अधिक्षक मनोज पाटील  अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल  , उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव,  यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक धडाकेबाज कार्यवाही करून जनतेचा विश्वास कमवला आहे पोलीसाकडे पाहण्याचा नागरीकांचा दुष्टीकोण ही बद्दलला आहे .
     पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या कल्पनेतून पोलीसांनी रहदारीची समस्या सोडवली, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. खोट्या केसेस  कमी   केल्या महिला दक्षता कमिटी स्थापन करून समस्या सोडवल्या, शाळा महाविद्यालयात तक्रार पेटी बसवल्या, गुन्हेगारी कमी झाली आहे. तालुक्यातील सावकारकीचा बिमोड करण्यासाठी जनतेत जागृती निर्माण केली व सावकारकीचा ज्यांना त्रास आहे त्यांनी तक्रार करावी असे आवाहन केले. तसेच दैनंदिन कामकाजाबरोबर जामखेड पोलीसांनी रक्तदान, वृक्षारोपण असे अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here