जामखेड न्युज——
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जामखेड तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न
आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात जामखेड तालुका शिवसेना (उबाठा ) पदाधिकारी बैठक संपन्न झाली. शिवसेना तालुका प्रमुख पदी अँड – मयूर डोके ची निवड झाल्यानंतर शिवसेनेची पहिली आढावा बैठक आज शिवसेना कार्यालय जामखेड मध्ये संपन्न झाली.
बैठको मध्ये विविध विषयांवर चर्चा झाली, येणारी विधानसभेची निवडणूकी संदर्भात सर्व शिवसेना पदाधिकान्यांची रणणिती काय असावी यावर ही चर्चा झाली,
येणा-या काळामध्ये शिवसेना घरा घरात पोहचवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक जिवाचे रान करील हा सुर बैठकी मध्ये सर्व शिवसैनिकचा होता.
अँड मयूर डोके यांची तालुकाप्रमुख म्हणून निवड झाली त्याबद्दल सर्व शिवसैनिकांनी त्यांचे अभिनंदन व सत्कार केला.
आजच्या आढावा बैठकीसाठी पदाधिकारी व सर्व कट्टर शिवसैनिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती या बैठकीसाठी, तालुकाप्रमुख ॲड. मयूर डोके, शहरप्रमुख गणेश काळे, ता. उपप्रमुख नागराज पानगावकर खर्डा, अरविंद ठाकरे, युवासेना ता. उपप्रमुख सुहास मदने खर्डा ,श्रीकांत चव्हाण, शुभम वराट, ओम सानप, मारुती वराट, राजेश लोहार, धनंजय भोसले, कृष्णा रंधवे, माधव राऊत, यशराज कुमटकर, समर्थ साळुंके, शिवाजी भोसले उपस्थित होते.