जामखेड न्युज——
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय सभागृहात दोन सत्रामध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गुरू बिराजदार, गणेश माळी, शुभम जाधव उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पाटील यांनी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान कर्मचारी यांना मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट हाताळणी, आचारसंहिता, मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गुरू बिराजदार आणि गणेश माळी यांनी ईव्हीएम यंत्राच्या हाताळणीविषयी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.
यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शंका, तांत्रिक समस्यांचे निवारण करण्यात आले. तसेच मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी व मतदान संपल्यानंतर करावयाच्या कार्यवाहीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली चित्रफितही उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दाखविण्यात आली.
प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार महादेव कारंडे, प्रितम ठोंबरे, योगेश जाधव, संजय काळे, मच्छिंद्र पाडळे आदींनी सहकार्य केले.