जामखेड न्युज——
अँड कालिदास पवार यांचे अल्पशा आजाराने निधन
तालुक्यातील बावी गावचे माजी सरपंच तथा जामखेड तालुक्यातील प्रसिद्ध वकील अँड. कालिदास पवार (आप्पा ) वय 65 यांचे दुःखद निधन झाले तरी त्यांचा अंत्यविधी 10 वाजता नान्नज रोड बावी येथे होईल. त्यांच्या निधनामुळे जामखेड व बावी परिसरात शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील एक नामांकित वकील म्हणून त्यांची ख्याती होती. तसेच त्यांनी बावीचे सरपंच पदही भुसवले होते काल ते करमाळा येथे गेलेले असताना त्यांना त्रास होऊ लागला ताबडतोब करमाळा येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले. बीपी खुपच लो झालेला होता. यातच आज पहाटे त्यांचे निधन झाले आहे.
त्यांच्या मागे पत्नी, आई, एक मुलगा (विवाहित) तीन मुली (विवाहित) असा परिवार आहे. ते आप्पा नावाने परिचित होते. त्यांचा अंत्यविधी बावी येथे सकाळी दहा वाजता होणार आहे.