Tuesday, February 10, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे शहरातील काम दोन महिन्यांपासून बंद गटारावर झाले...

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे शहरातील काम दोन महिन्यांपासून बंद गटारावर झाले अतिक्रमणे, नगरपरिषद पाईपलाईन कोठून जाणार?

0
1067

जामखेड न्युज——

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे शहरातील काम दोन महिन्यांपासून बंद

गटारावर झाले अतिक्रमणे, नगरपरिषद पाईपलाईन कोठून जाणार?

 

जामखेड परिसरात कामाच्या श्रेयावरून दोन्ही आमदारांमध्ये श्रेयवाद सुरू आहे. मात्र दोन महिन्यांपासून रखडलेल्या कामाबद्दल कोणीही बोलायला तयार नाही. जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील रस्ता बाकी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये एका आमदाराने सांगितले की, कोणाच्याही इमारती ला धोका पोहचणार नाही. मात्र रस्ता नियमानुसारच होणार असे अधिकारी सांगतात. यामुळे निवडणूक काळात कोणाला दुखवायचे नाही म्हणून तर काम बंद ठेवलेले नाही ना असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. दोन वर्षांपासून काम सुरू आहे तरीही काम निम्मेही झाले नाही. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंने गटार असून गटाराच्या बाहेर नगरपरिषद पाईप लाईन साठी तीन तीन फुट जागा आहे मात्र गटार झाले नाही लगेच अनेक ठिकाणी गटारावर टपऱ्या झाल्या. अनेकांनी तर टपऱ्या टाकून त्या भाड्याने दिलेल्या आहेत. आता पाईपलाईन कोठून जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच लवकर रस्ता व्हावा अशी नागरिकांनी मागणी होत आहे. गटारावरील टपऱ्यासाठी दोन लाख डिपाँजीट व दहा हजार रुपये भाडे असा रेट ठरलेला आहे.

जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी. रस्ता १५७.६२ कोटी रुपयांचा रस्ता ठेकेदार ईपीसी कंत्राटदार, धनेश्वर कन्स्ट्रक्शन, गणेश कन्स्ट्रक्शन या तीन ठेकेदारांनी ८६.०९ कोटी रुपयांना काम घेतले आहे. दोन वर्षापूर्वीच काम सुरू झालेले असले तरी काम खुपच संत गतीने सुरू आहे. शहरातील जनता धुळने त्रस्त आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रस्ता बंद आहे. खर्डा चौक ते विश्वक्रांती चौक पर्यंत पूर्ण रस्ता बाकी आहे. तर विश्वक्रांती चौक ते बैल बाजार गेट पर्यंत एक बाजू अपूर्ण आहे. सतत काम बंद चालू यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. लवकरात लवकर रस्ता व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग 548 डी या रस्त्याची रूंदी रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर म्हणजे 50 फुट दोन्ही बाजूस आहे. गटाराबाहेर परत नगरपरिषदेच्या तीन तीन फूट जागा आहे मात्र गटारावर टपऱ्या झाल्या आहेत.

मोठा गाजावाजा करून जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला मोठा रस्ता होणार शहरातील अनेक अतिक्रमणे निघणार असे सांगितले जात होते. मात्र लोकसभा निवडणुकांमध्ये आमदार प्रा. राम शिंदे यांनी सांगितले होते की, कोणाचीही इमारत जाणार नाही असे आश्वासन दिले होते. नेमके आता विधानसभा निवडणुक आल्याने कोणाला दुखवायचे नाही म्हणून कदाचित रस्त्यास विलंब लागत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.


अनेक ठिकाणी रस्ता कडेने गटाराचे काम केलेले आहे. गटारावरील स्लॅब हा कमीत कमी चार इंच असावयास हवा पण अनेक ठिकाणी चार इंच जाडीचा स्लॅब नाही तसेच नीट पाणी न मारल्यामुळे अनेक ठिकाणी कामाला तडे गेलेले आहेत. तसेच कच्चा रस्ता डीएलसी स्तरावरील सिमेंट स्थराची राख झालेली आहे. कच्चा रस्ता पुर्णपणे निकामी झालेला आहे. गेल्या दीड ते दोन वर्षापासून रस्ता काम खुपच स्लो सुरू आहे. याबाबत सर्व राजकीय नेते गप्प आहेत जनता मात्र त्रस्त आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!