जामखेड न्युज ——-
ह.भ.प.उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त साकतमध्ये उद्यापासून भव्य-दिव्य अखंड हरिनाम सप्ताह
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांची किर्तन सेवा
हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये मोठ्या उत्साहात आश्विन वद्य १ शुक्रवार दिनांक 18 पासून सुरूवात होत आहे. तर सांगता आश्विन वद्य ९ शुक्रवार २५ रोजी सांगता आहे तरी भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजक हभप उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.
सर्व सज्जन भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होत आहे कि, श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४२ व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक येणार आहेत तरी भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.
रोज सायंकाळी सात ते नऊ महाराष्ट्रातील नामवंत महाराजांची किर्तन सेवा होणार आहे.
शुक्रवार दि. १८ रोजी ह. भ. प. भजन सम्राट गरूवर्य हनुमंत महाराज मते दहिफळकर
शनिवार दि. १९ रोजी ह. भ. प. कल्याण महाराज कोल्हे, महादेव दरा बीडसांगवी
रविवार दि. २० रोजी गुरू कान्होबा महाराज देहूकर संत जगदगुरु तुकाराम महाराज यांचे वंशज पंढरपूर.
सोमवार दि. २१ रोजी ह. भ. प. भानुदास महाराज शास्त्री श्रीराम संस्थान गोमळवाडा
मंगळवार दि. २२ रोजी ह.भ.प. कृष्णाजी महाराज नवले श्री क्षेत्र पैठणकर
बुधवार दि. २३ रोजी ह. भ.प.न्यायाचार्य सत्यवान महाराज लाटे बीड
तसेच गुरूवार २४ रोजी ह.भ.प. ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे हासेगावकर अध्यक्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी
गुरूवार दि. २४ रोजी सकाळी ८ ते १० दिंडी मिरवणूक तसेच १२ ते २ ह.भ.प. उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन होईल
तसेच शुक्रवार दि २५ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे कीर्तन होईल.
या किर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हभप पंडित केशव महाराज जगदाळे, जालिंदर बप्पा येडशीकर, भरत पठाडे, आसाराम महाराज साबळे, बाजीराव महाराज वराट, मदन महाराज टिपरे, उत्तरेश्वर महाराज टिपरे, भिमराव महाराज मुरूमकर, बाबा महाराज मुरूमकर, बाळू सुरवसे, मच्छिंद्र वाळेकर, हरिदास आबा गुंड, दिपक अडसूळ असतील
गायनाचार्य – हभप बिभीषण महाराज कोकाटे, हरीभाऊ महाराज काळे, कृष्णा महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, भरत महाराज साठे, नामदेव चव्हाण, अशोक सपकाळ, दिनकर मुरूमकर, भास्कर फुंदे, केशव घोलप, विष्णू म्हेत्रे, दादा आजबे, भाऊसाहेब कोल्हे, पंढरीनाथ राजगुरू, भरत घोलप, आण्णा घुमरे, गहिनीनाथ सकुंडे, प्रकाश महारनवर, नाना महारनवर, जालिंदर महारनवर, कल्याण राऊत, दत्ता घुमरे सह परिसरातील सर्व भजनी मंडळे
भजन कीर्तन व्यवस्थापक दिनकर मुरूमकर, श्रीकांत वराट, पांडुरंग अडसूळ, रामकिसन लहाने, दिपक अडसूळ यांच्या सह परिसरातील भजनी मंडळे
गावातील भजनी मंडळ व नर्मदेश्वर वारकरी गुरूकुलातील सर्व विद्यार्थी सात दिवस हजर राहतील.
सप्ताहाचे संयोजक म्हणून हभप विवेकानंद भारती महाराज उर्फ उत्तम महाराज वराट, मृदंगाचार्य बाजीराव महाराज वराट व उत्तरेश्वर महाराज वराट असतील.
तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.