जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
पोलीस स्टेशनला पोस्को अंतर्गतही गुन्ह्यातील एका आरोपीस अटक
जामखेड तालुक्यातील सातेफळ येथील अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर मुलीचा मृतदेह विहरीत आढळून आला असता, तपासा अंती प्रेम प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा खर्डा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला असून गुन्हातील आरोपी सुभाष लक्ष्मण लटके यास पोलिसांनी तातडीने ताब्यात घेऊन अटक केली आहे, या घटनेने सातेफळ गावात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातेफळ येथील अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा गुन्हा खर्डा पोलीस स्टेशनला चार दिवसापूर्वी दाखल झाला होता.
त्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असता पोलिसांनी तपासात सदरची मुलगी ही गावातील एका माणसाकडून मोबाईल घेऊन तिने फोन लावला होता,
त्यानंतर ती शेताकडे गेल्याचे सांगितले गेले त्यानंतर पोलिसांनी गावच्या पोलीस पाटलाच्या मदतीने अनेक विहिरी तपासल्या असता एका विहरी जवळ तिचा सॅंडल व ओढणी मिळून आल्याने स्थानिकांच्या मदतीने चार तासांच्या प्रयत्नानंतर अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला.
त्यानंतर सदर मृतदेह पोस्टमार्टम साठी पुढे पाठविण्यात आला. त्यानंतर खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवली असता आरोपी सुभाष लक्ष्मण लटके वय 22 वर्षे राहणार सातेफळ यास BNS 1074 ,64,64(2),(M),351,(2),(M),351,(2)351,(3) पोस्को अंतर्गत गुन्ह्यात तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर गुन्ह्याचा खरा छडा लागणार आहे.
सदर गुन्ह्याचा तपास डीवायएसपी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनची सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व पोलीस नाईक संभाजी शेंडे हे करीत आहेत.