जामखेड न्युज ——-
जामखेड प्रारूप विकास आराखड्याबाबत भाजपा पिलावळीकडून जनतेची दिशाभूल – रमेश आजबे
डीपी प्लॅन गुगळेंच्या आयकाँन सीटीत तयार झाला
जामखेड प्रारूप विकास आराखडा रद्द झालेला नसताना रद्द झाल्याची माहिती भाजपा पिलावळीकडून पत्रकार परिषद घेऊन जामखेड करांची दिशाभूल केली आहे. विकास आराखडा रद्द करण्यात आला नाही तरीही निवडणूक समोर ठेवून जनतेची दिशाभूल करत आहेत. आमदार रोहित पवार यांनी या विकास आराखडा विरोधात कोणीही वर्गणी करू नये मी स्वतः खर्च करतो असे सांगितले असताना भाजपा पिलावळीकडून मोठ्या प्रमाणावर वर्गणी करून जामखेड करांची दिशाभूल केलेली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस ने आज पत्रकार परिषद घेत सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने
जामखेड प्रारूप विकास आराखडा विषयी सखोल पत्रकार परिषद घेत भाजपा पिलावळीचा पर्दाफाश केला आहे. यावेळी राजेंद्र कोठारी, शहाजी राळेभात, रमेश आजबे, प्रशांत राळेभात, उमर कुरेशी, राजेंद्र पवार, प्रकाश काळे, राजेंद्र गोरे, अमोल गिरमे, अँड. हर्षल डोके, वसीम सय्यद, प्रकाश सदाफुले, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, गणेश घायतडक यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रमेश आजबे यांनी सांगितले की,जामखेड मल्लनिस्सार ची मंजुरी आमदार रोहित पवार यांनीच दोन वर्षांपूर्वी मंजुरी आणली होती आणि आज आमदार प्रा. राम शिंदे यांनी त्यांचे भूमीपूजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. तसेच प्रारूप विकास आराखडा रद्द झालेला नसताना रद्द केला म्हणून आज भाजप संबंधित बचाव कृती समितीच्या वतीने आमदार प्रा. राम शिंदे यांचा सत्कार करत आहेत. ही भुलवाभुलवी आहे. सध्या निवडणूक समोर ठेवून केली जात आहे.
डीपी प्लॅन गुगळेंच्या आयकाँन सीटीत तयार झाला
शहरातील मोठे बिल्डर गुगळे, फिरोदिया, शिंदे यांच्या फायद्यासाठी डीपी प्लॅन बनवण्यात आलेला आहे. कोणाच्या सांगण्यावरून बनवला याची चौकशी होणे आवश्यक आहे. या डीपी प्लॅन विरोधात कोर्टात जो खर्च होईल तो स्वतः आमदार रोहित पवार करणार होते तरीही बचाव कृती समितीच्या वतीने वर्गणी गोळा करण्यात आली व जनतेची दिशाभूल सुरू आहे.
रोहित पवार यांच्या कामाचे भुमीपजन शिंदे करत आहेत. हेच मोठे दुर्दैव आहे. यावेळी राजेंद्र कोठारी, शहाजी राळेभात, अमोल गिरमे यांनी सविस्तर माहिती दिली तसेच अँड हर्षल डोके यांनी आभार मानले.
चौकट
जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समिती ही भाजपा पुरस्कृत आहे. ते जनतेची दिशाभूल करत आहेत. हा सगळा खटाटोप गुगळे फिरोदिया व शिंदे यांना फायदा व्हावा म्हणून सुरू आहे. त्यामुळे मी या कमिटीतून मी बाहेर पडत आहे. असे बचाव कृती समितीचे सदस्य अमोल गिरमे यांनी सांगितले.