जामखेड न्युज——
मुख्यमंत्री यांच्या लेखी आश्वासनानंतर कदम यांचे आत्मदहन आंदोलन मागे
आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार होते आत्मदहन आंदोलन
फसवणूक प्रकरणातील आरोपीस अटक करण्यास
प्रशासनाला अपयश येत असेल, जिल्हा प्रशासन न्याय देत नसेन तर आत्मदहन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे फिर्यादी सौरभ कदम यांनी केली होती. आरोपींकडून फिर्यादी कदम यांच्या कुटुंबीयांना धोका असल्याचे कदम यांचे मत होते आरोपीस अटक न केल्यास 14 आँक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सौरभ विठ्ठल कदम यांनी दिला होता त्यांनी त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मेल पाठविला होता तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडून ताबडतोब पोलीस महासंचालक व जिल्हाधिकारी यांना मेल पाठवून आरोपीस अटक करण्याचे आदेश दिले यामुळे आज होणारे आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात येत आहे असे सौरभ कदम यांनी सांगितले.
अण्णा सावंत विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला
420 506 504 34 फसवणुकीचा गुन्हा 25-06-2024 रोजी दाखल झालेला आहे. गुन्हा झालेला आहे. आरोपीचा अटकपूर्व जामीन श्रीगोंदा सेशन कोर्टाने फेटाळला आहे. व छत्रपती संभाजीनगर च्या उच्च न्यायालयाने आरोपीला अतरिम दिलासा दिलेला नाही. यातील एक आरोपीस अटक करण्यात आली आहे.
आण्णा आदिनाथ सावंत यांना अटक झालेली नाही सदर आरोपी जामखेड शहरात मोकाट फ़िरत आहेत या आरोपी कडून मला व माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका आहे व आरोपी मला वारंवार धमकी देतात तरी साहेबांनी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना आरोपींना अटक करण्यासाठी आदेश देण्यात यावेत. मी 14-10-2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर समोर आत्मदहन करणार आहे. मला जर जिल्हा प्रशासन न्याय देवू शकत नाही तर मला आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून ताबडतोब पोलीस महासंचालक व जिल्हाधिकारी यांना मेल पाठवून आरोपीस अटक करण्याचे आदेश दिले यामुळे आज होणारे आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात येत आहे असे सौरभ कदम यांनी सांगितले.
आण्णा सावंत हा आरोपी मोकाट फिरत आहे मात्र पोलीसांना दिसत नाहीत. आरोपींकडून जीवीताला धोका असल्याचे निवेदन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. तसेच जामखेड पोलीसांनी आरोपीला अटक केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फिर्यादी कदम यांनी उपोषण केले होते. जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक यांना आरोपीस अटक करण्यास आदेश दिलेला होता. तेव्हा उपोषण मागे घेतले होते मात्र पंधरा दिवस झाले तरी आरोपीस अटक झालेली नाही तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 14 आँक्टोबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा कदम यांनी दिला होता. आता आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यामुळे आरोपीस कधी अटक होते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
आण्णा सावंत विरोधात नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखाची फसवणूक केली असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आगोदरही जामखेड पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल आहे. माझी मंत्रालयात ओळख आहे. मी तुला आरोग्य विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी लावून देतो असे म्हणत संभाजी ब्रिगेडचा प्रदेश उपाध्यक्ष आण्णा सावंत याच्या सह दोघा जणांनी नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक केलेली आहे.
या प्रकरणी आण्णा सावंत सह दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एक आरोपी विठ्ठल सावंत यास अटक करण्यात आलेली आहे. तर आण्णा सावंत मोकाट फिरत आहे. आता फिर्यादी कदम यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने एकच खळबळ उडाली होती. पण मुख्यमंत्री यांच्या लेखी आदेशाने आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात येत आहे असे कदम यांनी सांगितले.