जामखेड न्युज——
बारामतीच्या एजन्सीने तयार केलेला प्रारूप विकास आराखडा शहर भकास करणारा होता – प्रा मधुकर राळेभात
जामखेड प्रारूप विकास आराखडा हा बारामती येथील एजन्सी ने केलेला होता तो शहर भकास करणारा होता. प्रशासकांच्या माध्यमातून आराखडा तयार करण्यात आला होता. यासाठी बचाव कृती समिती च्या वतीने जनजागृती, उपोषण, शहर बंद, धरणे आंदोलन करण्यात आले व प्रारूप विकास आराखडा रद्द करण्यास भाग पाडले. असे प्रा. मधुकर राळेभात यांनी सांगितले.
प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीची आमदार प्रा राम शिंदे यांनी मुख्यमंत्री यांच्या बरोबर बैठक लावत आराखडा रद्द केला. आता नव्याने नवीन नगरसेवक सर्व समावेश आराखडा करून सुंदर आराखडा तयार करू असे राळेभात यांनी सांगितले.
आराखडा रद्द झाल्याने अन्यायकारक प्रारूप विकास आराखडा तयार करणाराचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. आता नव्याने सर्व समावेशक नवीन आराखडा तयार करण्यात येईल असे प्रा. मधुकर राळेभात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आज जामखेड प्रारूप विकास बचाव कृती आराखडा यांच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे प्रा. मधुकर आबा राळेभात (अध्यक्ष), आकाश दिलीप शेठ बाफना (कार्याध्यक्ष), अमित अरुणशेठ चिंतामणी (उपाध्यक्ष), विनायक विठ्ठलराव राऊत (सचिव), राहुल अंकुश उगले (सहसचिव), अविनाश दशरथ साळुंके (खजिनदार), सन्मानीय सदस्य अशोक जावळे, डॉ.संजय राऊत, मोहन पवार हे जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीतील सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना सर्वच सदस्यांनी प्रारूप विकास आराखडा रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच विकास आराखडा बचाव समितीला मदत करणारे आमदार प्रा राम शिंदे यांचे आभार मानले.