जामखेडमध्ये लोहारदेवी मंदिर परिसरात विजयादशमी निमित्त रावण दहन कार्यक्रम, हिंदुदसरा मेळाव्यात व दौडीत सहभागी व्हावे – श्री शिवप्रतिष्ठान

0
354

जामखेड न्युज——-

जामखेडमध्ये लोहारदेवी मंदिर परिसरात विजयादशमी निमित्त रावण दहन कार्यक्रम

हिंदु दसरा मेळाव्यात व दौडीत सहभागी व्हावे – श्री शिवप्रतिष्ठान

 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून घटस्थापना ते विजयादशमी अर्थात दसरा या कालावधीमध्ये दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येत असते.

दुर्गा माता दौडीचे वैशिष्ट्ये हे की पहाटे पाच वाजता शनी मंदिर चौकातून दौड सुरू होत असते व शेवटी लोहार देवी येथे जगदंबा मातेच्या आरतीने समारोप होतो. यामध्ये शिवरायांचे व देशभक्ती गीतं आणि जयघोष केला जातो. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शेकडो तरुण आगेकुछ करत असतात.

छत्रपती शिवरायांच्या रूपाने स्वराज्याचा भगवा ध्वज पुढे असतो त्या मागे शस्त्र पथक व शेकडोच्या संख्येने तरुण यामध्ये सहभागी होत असतात.

उद्या शनिवार १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता दुर्गादेवीदेवी मंदिर बाजारतळ येथून महादौड निघणार आहे व लोहार देवी येथे रावण दहन सायंकाळी सात वाजता होणार आहे. 

यावेळी हलगी पथक, लाठीकाठी, शस्त्र पथक, मल्लखांब रोप मल्लखांब पथकाचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.


तरी सर्वांनी या आपल्या हिंदुदसरा मेळाव्यात व दौडीत सहभागी व्हावे . असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान तालुका अध्यक्ष पांडुरंग मधुकर भोसले यांनी केली .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here