जामखेड न्युज——
जामखेड शिवसेना शहरप्रमुख गणेश काळे शिवसेनेसोबतच
जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला त्यांच्या बरोबर अनेक शिवसेनेचे पदाधिकारी यांनीही शिवसेना सोडली मात्र शिवसेना शहरप्रमुख गणेश काळे हे शिवसेना (उबाठा) बरोबरच आहेत असे शहरप्रमुख गणेश काळे यांनी सांगितले.
गणेश काळे हे गेल्या सहा वर्षापासून शिवसेना शहरप्रमुख म्हणून एकनिष्ठेने काम करत आहेत. त्यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले की, मी आतापर्यंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाबरोबरच आहे मी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही व करणारही नाही.
माझी नेमणूक पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे. मी शिवसेना (उबाठा) बरोबर एकनिष्ठ आहे. मी पक्ष सोडलेला नाही. यापुढे ही पक्षाचे एकनिष्ठेने काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. माझे सर्व कार्यकर्ते जाग्यावरच आहेत.
तसेच जामखेड तालुक्यातील एकनिष्ठ शिवसैनिक जाग्यावरच आहेत. आम्ही पुन्हा जोमाने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत.
आमच्या बरोबर अल्पसंख्याक शिवसेना तालुकाप्रमुख नासीर खान सह सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसेनेबरोबरच जाग्यावरच आहेत.