जामखेड न्युज——
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थनार्थ उद्या जामखेड बंद..!

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलक सुरु आहे. मागच्या सहा दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटीत ते उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या सोमवारी अहिल्यानगर जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार आहे. उद्या जामखेड बंद पाळण्यात येणार आहे.

मंत्री शंभुराज देसाई आणि मराठा कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर मनोज जरांगेंनी काल रात्री सलाईन घेतली. त्यांच्या या आंदोलनाला मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अहिल्यानगर जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे जामखेड शहर बंद राहणार आहे.

मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारकडून वारंवार शब्द देऊन चालढकल केली जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे. याकडे शासनाने पुर्णतः दुर्लक्ष होत आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे.

सोमवारी अहिल्यानगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. यामुळे जामखेड बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.






