जामखेड न्युज——
राज्यस्तरीय थाळीफेक स्पर्धेत सिद्धी रासकर द्वितीय, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थ्यीनी सिद्धी अर्जुन रासकरने पुणे बालेवाडी येथे महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन च्या राज्यस्तरीय थाळीफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.
दिनांक 19 ते 22 सप्टेंबर 2024 पुणे बालेवाडी येथे महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन च्या राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड ची खेळाडू कुमारी सिद्धी अर्जुन रासकर हिने थाळीफेक या प्रकारात राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
सिध्दी रासकरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक रमेश चौधरी, पर्यवेक्षक पी. टी. गायकवाड, क्रीडा शिक्षक राघवेंद्र धनलगडे, साळुंखे सर, पाटील सर, बापू जरे सर सह सर्व शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे.
गेल्या वर्षीही 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर 2023 दरम्यान डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये सिद्धी अर्जुन रासकर हिने सोळा वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला आहे व तिची कोटा राजस्थान येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली होती.
महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय ज्युनिअर मैदानी स्पर्धा 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर रोजी डेरवण रत्नागिरी ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन ची खेळाडू कु. सिध्दी रासकर या खेळाडूंने थाळी फेक या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.