जामखेड न्युज——
जामखेड तालुका ग्रेड मुख्याध्यापक संघाची कार्यकारीणी जाहीर
अध्यक्षपदी वैजीनाथ गीते, उपाध्यक्ष दत्तात्रय यादव व संजय कर्डिले
जामखेड तालुका ग्रेड मुख्याध्यापक संघाची नुकतीच जामखेड तालुक्यातील ग्रेड मुख्याध्यापकांची बैठक जामखेड येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये जामखेड तालुक्याच्या मुख्याध्यापक संघाच्या तालुका अध्यक्षपदी वैजिनाथ गीते यांची निवड सर्वांनुमते करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना श्री गीते सर म्हणाले की मुख्याध्यापक पद हे प्राथमिक शिक्षक व प्रशासन अधिकारी यांच्यामधील दुवा आहे म्हणून मुख्याध्यापकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी व माझी कार्यकारणी प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे शिक्षकांना व प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे आव्हान केले.
तसेच हा मुख्याध्यापक संघ शिक्षकांच्या कोणत्याही संघटनेच्या दबावाखाली काम करणार नाही सर्व मुख्याध्यापक स्वतंत्रपणे आपले मत व्यक्त करून सर्व प्रश्न सोडवून सचोटीने काम करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वैजिनाथ गीते व सर्व कार्यकारिणी मुख्याध्यापकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
जामखेड तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारीणी खालील प्रमाणे.
1) वैजनाथ फुलचंद गीते – अध्यक्ष
2) शिवाजी हजारे – कार्याध्यक्ष
3) रुपेश वाणी – सरचिटणीस
4) संजय विष्णू कर्डिले – उपाध्यक्ष
5) दत्तात्रेय महादेव यादव – उपाध्यक्ष
6) संतोष कुमार वांढरे – कोषाध्यक्ष
7) संजय भगवान हजारे – कार्यालयीन चिटणीस
8) शाकीर शेख – प्रसिद्धीप्रमुख
9) सुनील कुमटकर – सहसचिव
10) दत्तात्रय गोवर्धन आंधळकर -सल्लागार
11) बळीराम अवसरे – सल्लागार