Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या आज ३५० रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ४६० बाधितांची रुग्ण संख्येत भर –...

आज ३५० रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ४६० बाधितांची रुग्ण संख्येत भर – रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६८ टक्के

0
274
जामखेड न्युज – – – 
 जिल्ह्यात आज ३५० रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७९ हजार ६५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४६० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ५५६ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २१४ आणि अँटीजेन चाचणीत २४४ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पाथर्डी ०१ आणि श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले ०२, जामखेड ४१, कर्जत १०, कोपरगाव १६, नगर ग्रा.०३, नेवासा १८, पारनेर १०, पाथर्डी ०६, राहता ०६,  राहुरी १०, संगमनेर २१, शेवगाव ३६, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर १८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २४४ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, अकोले ०४, जामखेड १५, कर्जत ३९, कोपरगाव ०९, नगर ग्रा. ०३, नेवासा २१, पारनेर ७१, पाथर्डी ३२, राहता ०२, राहुरी ०६, संगमनेर ०७, शेवगाव ०७, श्रीगोंदा २५ आणि श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १६, जामखेड ३७, कर्जत १८, कोपरगाव १८, नगर ग्रा. २४, नेवासा २१, पारनेर ६२, पाथर्डी ३९, राहता ०३, राहुरी १०, संगमनेर ३६,  शेवगाव २१, श्रीगोंदा ३४, श्रीरामपूर ०७ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:२,७९,६५४*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३५५६*
*पोर्टलवरील मृत्यू नोंद:६०४३*
*एकूण रूग्ण संख्या:२,८९,२५३*
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!