जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
श्री साकेश्वर विद्यालय साकत येथील इयत्ता दहावीमध्ये नव्वद किंवा नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन पेढे भरवून व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ. भगवानराव मुरुमकर, सरपंच हनुमंत पाटील, ज्ञानदेव मुरुमकर, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, हनुमंत लहाने, सतिश लहाने, हरी लहाने, नागराज मुरुमकर, उदयकुमार दाहितोडे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अशोक घोलप, विजय हराळे, आश्रू सरोदे, अतुल दळवी यांच्या सह अनेक पालक व विद्यार्थी हजर होते.
*प्रथम क्रमांक – तनवी किशोर मुरुमकर 98.00%*
*द्वितीय क्रमांक – गायत्री हनुमंत लहाने – 96.60%*
*तृतीय क्रमांक – साक्षी नानासाहेब लहाने – 94.20%*
*चतुर्थ क्रमांक – ज्ञानेश्वरी रामहारी वराट – 94.00%*
*पाचवा क्रमांक – अदिती रामभाऊ वराट – 93.80%*
*सहावा क्रमांक – तेजस्विनी अतुल दळवी – 90.40 %*