जामखेड न्युज——
जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समिती तयार
प्रशासक काळात तयार केलेला जामखेड शहर विकास आराखडा प्रशासनाने नेमका कोणाच्या फायद्यासाठी केला असा सवाल नागरिक उपस्थित करतांना दिसून येत आहेत. व्यापार्यांना, राजकीय, सामाजिक लोकांना, जनतेला विश्वासात न घेता केलेल्या शहरविकास आराखड्याला शहरातील व्यापारी मुस्लिम पंच कमिटी व नागरिकांनी विरोध करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. याचा पुनर्विचार करावा अशी मागणी प्रा. मधुकर राळेभात, आकाश बाफना, विनायक राऊत, अमित चिंतामणी यांनी केली आहे.
जामखेड नगरपरिषद यांनी प्रसिद्ध केलेला जामखेड शहर प्रारूप विकास योजना आराखडा बाबत बऱ्याच नागरिकांनी हरकती घेतलेल्या होत्या त्या हरकतींवर म्हणणे मांडण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने नोटीस काढून त्या हरकती संदर्भात म्हणणे सादर करणे बाबत सूचित केले आहे. यानुसार युवा उद्योजक आकाश बाफना, विनायक राऊत व प्रा. मधुकर राळेभात हे जामखेड करांच्या हक्कासाठी न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे यापूर्वी ही दिसून आले आहे.
जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समिती तयार पुढील प्रमाणे तयार करण्यात आली आहे.
प्रा. मधुकर आबा राळेभात (अध्यक्ष)
श्री आकाश दिलीपशेठ बाफना
(कार्याध्यक्ष)
ॲड.शमा हाजी काझी साहेब
( उपाध्यक्ष )
श्री अमित अरुणशेठ चिंतामणी
(उपाध्यक्ष)
श्री विनायक विठ्ठलराव राऊत
(सचिव)
श्री राहुल अंकुश उगले , (सहसचिव)
श्री अविनाश दशरथ साळुंके
(खजिनदार)
श्री अमोल रमेश गिरमे
(समन्वयक)
सन्मानीय सदस्य
श्री अशोक जावळे
श्री डॉ.संजय राऊत
श्री राजेंद्र देशपांडे
श्री सय्यद जावेदअली
श्री विजय गव्हाणे
वरील समितीमधील नाव हे कार्यालयीन कामकाजासाठी निश्चित करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे आजच्या मीटिंग साठी उपस्थित सर्व सदस्य हे समितीचे सन्मानीय सभासद आहेत याची नोंद घ्यावी असे म्हटले आहे.