जामखेड न्युज——
भटक्या समाजातील एकही व्यक्ती पुराव्यापासून वंचित राहणार नाही – राधाकिसन देवढे सहाय्यक संचालक समाजकल्याण विभाग
अन्न वस्त्र निवारा माणसाच्या मूलभूत गरजा आहे. त्यापैकी निवारा हा घटक मुख्य आहे शासनाने घरकुल योजने मध्ये सुटसुटीतपणा आणला आहे. प्रत्येकाला घरकुल मिळाले पाहिजे कोणही घरापासून वंचित राहिला नाही पाहिजे जे भटके विमुक्त आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना शिक्षणासाठी विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती लाभ घेतला पाहिजे आपला आदिवासी व भटके विमुक्त समाज स्वावलंबी बनला पाहिजे तसेच शासनाच्या विविध योजनेबद्दल माहिती सांगितली. तसेच भटक्या विमुक्त जाती जमाती समाजातील एकही व्यक्ती पुराव्यापासून वंचित राहणार नाही असे सहाय्यक समाजकल्याण विभाग अहमदनगर चे राधाकिसन देवढे यांनी सांगितले.
आज दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य व ग्रामीण विकास केंद्र जामखेड यांच्या समन्वयातून तसेच पंचायत समिती जामखेड यांच्या सहकार्याने लोक कल्याणकारी योजनांचा प्रसार व प्रसिद्धी मेळावा मा.श्री.ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक पाहुणे मा.श्री.राधा किसन देवढे साहेब (सहाय्यक संचालक समाज कल्याण अहमदनगर) मा.श्री.प्रकाश पोळ साहेब (गट विकास अधिकारी जामखेड) मा.राहुल गांगर्डे साहेब अनिल गर्जे साहेब मा.बापू ओहोळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून झाली विचारपीठ मंचावर प्रमुख पाहुण्यांचे ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या वतीने गुलाब गुच्छ शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.. या मेळाव्यास जवळपास भटके विमुक्त आदिवासी व समूहातील 200 लोक कोल्हाटी मसनजोगी वडार कैकाडी भिल्ल पारधी मदारी उंटवाले गारुडी तिरमली वैदू घिसाडी उपस्थित होते.
तसेच यावेळी मा.ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव म्हणाले की मी गेली 31 वर्षापासून काम करतोय 31 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक विभागात सोबत काम करतो परंतु पहिल्यांदा महाराष्ट्र व देशात फिरत असताना भटके मुक्तांच्या आदिवासींच्या वाडीवस्ती वरती भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार इथल्या पालावरती वाडी वस्ती वरती शेवटच्या माणसापर्यंत गेला पाहिजे जे काही समाज कल्याण विभागाच्या कल्याणकारी योजना आहे त्या इथल्या शेवटच्या माणसापर्यंत गेले पाहिजेत.
त्यापैकी माधव वाघ साहेब आणि आता तुम्ही देवढे साहेब गोरगरीब आदिवासी भटके विमुक्त यांच्यासाठी तुम्ही देव स्वरूपात मिळालेले व्यक्तिमत्व आहेत.माझ्या कार्यकर्त्याला मी सतत सांगत असतो की ज्यांना कल्याणकारी योजना माहीत नाही कल्याणकारी योजनेची गाठ होत नाही त्यांच्या सोबत काम करा आदिवासी भटके विमुक्त समाजाला नागरिकत्वाचे पुरावे नाही घरकुल नाही शिक्षणाचे संधी मिळत नाही उपजीविकेचे साधने नाहीत बँकांकडून कर्ज मिळत नाही कसून खाण्यासाठी जमीन नाही आरोग्याच्या सुविधा मिळत नाही शासन दरबारी हेलपाटे मारून सुद्धा त्यांचे काम होत नाही अजूनही भटके विमुक्त व आदिवासी समाजाला कसलं स्वातंत्र्य म्हणावे लागेल असा प्रश्न मला पडतो असे अरुण आबा म्हणाले.
यावेळी मा.बापू ओहोळ ओंकार निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले प्रस्तावना मा.प्रकाश पोळ (गटविकास अधिकारी जामखेड) यांनी केले सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले.
यावेळी विशाल पवार आदिवासी नेते, आजिनाथ शिंदे,ऋषिकेश गायकवाड ,राजू शिंदे,रेश्मा बागवान,उर्मिला कवडे,मनीषा सिंगाने अरुण चव्हाण,नंदा शेगर, दिपाली काळे,उत्तम सावंत,सुनील काळे शाहनुर काळे, एम. डी.महानोर सर तसेच पंचायत समिती सर्व पदाधिकारी उपस्थित होते.