जामखेड न्युज——
नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व आमदार रोहित पवार यांच्याकडेच – सरपंच हनुमंत पाटील
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून श्री साकेश्वर विद्यालयास सायकल वाटप
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून आतापर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम राबविलेले आहेत. चौदा हजार सायकली, रायटिंग पँड, चाॅकलेट, कोरोना काळात शाळांसाठी सँनिटायझर, मास्क वाटप करण्यात आले आहे यामुळे नेतृत्व कर्तृत्व व दातृत्व हे आमदार रोहित पवार यांच्या कडेच आहे. असे सरपंच हनुमंत पाटील यांनी सांगितले.
श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी गेल्या वर्षी 104 तर या वर्षी 59 सायकल आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक दत्ता काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक विकास वराट, सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, ज्ञानदेव मुरूमकर, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, प्रसाद होशिंग, मुकुंद वराट, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह सर्व विद्यार्थी व अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार रोहित पवार यांनी श्री साकेश्वर विद्यालयास गेल्या वर्षी 104 व या वर्षी 59 सायकल वाटप केल्या म्हणजे 163 सरासरीने पाच हजार रुपये किंमत गृहीत धरली तर आठ लाख पंधरा हजार रुपयांच्या सायकली या विद्यालयास वाटप करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. हाच वेळ अभ्यासासाठी वापरता येईल.
यावेळी माजी आदर्श मुख्याध्यापक विकास वराट हे नुकतेच सेवानिवृत्त झाले याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले तसेच दहावीमध्ये प्रथम क्रमांकास 3 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 2 हजार रुपये तर तृतीय क्रमांकास एक हजार रुपये बक्षिस देण्यात येईल असे सांगितले.
सध्या पावसाळी क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. मुलांना टीशर्ट व शाँर्ट पँन्ट नाही ही अडचण ओळखून सरपंच हनुमंत पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना टि शर्ट व शाँर्ट पँन्ट देण्याचे मान्य केले यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदाम वराट यांनी केले यावेळी, समृद्धी वराट, लक्ष्मी वराट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका डोके तर आभार ऋतुजा वराट ने मानले.