प्रगतशील तरूण शेतकरी गणेश कडू यांचे हृदयविकाराने निधन शिऊर सोसायटीचे चेअरमन यांना पुत्रशोक

0
2124

जामखेड न्युज——–

प्रगतशील तरूण शेतकरी गणेश कडू यांचे हृदयविकाराने निधन

शिऊर सोसायटीचे चेअरमन यांना पुत्रशोक

 

जामखेड तालुक्यातील शिऊर येथील तरूण व प्रगतशील शेतकरी गणेश ज्ञानदेव कडू ( वय ३५) यांचे रात्री हृदय एकराच्या झटक्याने निधन झाले यामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

गणेश ज्ञानदेव कडू यांनी हे प्रगतशील शेतकरी होते शेतात डाळिंब पीक घेत होते. चांगल्या प्रकारे शेती करत होते. काही दिवसांपासून त्यांना बीपीचा त्रास जाणवत होता. रात्री अचानक त्रास सुरू झाला ताबडतोब जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले पण डॉक्टरांनी मृत घोषित केले.

गणेश कडू यांचे वडील ज्ञानदेव कडू हे शिऊर सोसायटीचे चेअरमन आहेत. गणेश च्या अकाली निधनामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

गणेश कडू यांचा भाऊ जनार्दन कडू सैन्यात आहे. वडील ज्ञानदेव कडू शिऊर सेवा संस्थेचे चेअरमन आहेत. त्यांच्या मागे आई वडील पत्नी एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

आज शिऊर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here