जामखेड न्युज——
स्मशानभूमीचा कायापालट करणारा अवलिया – राम मुरूमकर
लोकसहभागातून स्मशानभूमीचा कायापालट
नामदेव महाराज संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त साकत येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण शालेय विद्यार्थी व विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. लाखो रुपये लोकवर्गणी तसेच आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून निधी यामुळे स्मशानभूमीचा कायापालट झालेला आहे आणि याचे सर्व श्रेय राम मुरूमकर यांनाच आहे. आता शेकडो झाडांमुळे स्मशानभूमीचे नंदनवन झाले आहे.
साकत येथील सामाजिक कार्यकर्ते राम मुरूमकर यांनी स्वतः च्या सेवानिवृत्ती निमित्त साकत येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण केले. तसेच या झाडांची स्वतः काळजी घेत दरवर्षी वाढदिवस व विविध सण समारंभ यानिमित्त वृक्षारोपण करण्यात येते यामुळे आज स्मशानभूमी परिसरात सुमारे सातशे लहान मोठे झाडे झालेली आहेत. तसेच स्मशानभूमीची सुधारणा करण्याची संकल्पना भावकीपुढे ठेवली याला निस्वार्थी पणे करत असलेल्या कामाला खुप छान प्रतिसाद मिळाला आणि भावकीतून सुमारे पाच लाख रुपये लोकवर्गणी करून स्मशानभूमीचा कायापालट केला. स्मशानभूमीला तार कंपाऊंड केले व आतमध्ये वृक्षारोपण केले.
आज संत नामदेव महाराज संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त साकत येथील स्मशानभूमीत विद्यार्थी व विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरूमकर, डॉ. अजय वराट, मुख्याध्यापक दत्ता काळे, ज्ञानदेव मुरूमकर, बाबासाहेब महारनवर, नागनाथ अडसूळ, चिंतामण वराट गुरूजी, अमृत लोहार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राम मुरूमकर हे दरवर्षी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करतात तसेच दलित वस्ती स्मशानभूमीचे काम हाती घेऊन तेथील लोकांचे मतपरिवर्तन करत याही स्मशानभूमीचा कायापालट केला कंपाऊंड करून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे.
आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मार्फत दहा लाख रुपये
आमदार प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून
सुशोभीकरणासाठी दहा लाख निधी देण्यात आला यामधून स्मशानभूमीत पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले तसेच भव्य दिव्य अशी कमान उभी करण्यात आली यामुळे साकत येथील स्मशानभूमीचा कायापालट झाला आहे.
राम मुरूमकर स्मशानभूमीचा कायापालट करणारे अवलिया
राम मुरूमकर हे जानेवारी 21 मध्ये वनविभागातून सेवानिवृत्त झाले आणि त्याच दिवशी गावात वृक्षारोपण व स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा संकल्प केला यानुसार पाच लाख रुपये लोकसहभाग गोळा केला यातून कंपाऊंड तसेच परिसरात वड, पिंपळ, चिंच, आंबा, फुलझाडे लावली. या स्मशानभूमीचा कायापालट तर झालाच दलित वस्ती येथे असलेल्या स्मशानभूमीचा कायापालट केला यामुळे स्मशानभूमीचा कायापालट करणारा अवलिया असे राम मुरूमकर यांना समजतात.