जामखेड न्युज——
भारत-श्रीलंका पहिला सामना टाय होऊनही सुपर ओव्हर का नाही? कारण..
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंग करत टीम इंडियासमोर 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 230 धावा केल्या. प्रत्युत्तरात कॅप्टन रोहित शर्माने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाची चांगली सुरुवात झाली. मात्र रोहित आऊ झाल्यानंतर टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स टाकल्या. त्यामुळे टीम इंडिया 48 व्या ओव्हरमध्येच 230 ऑलआऊट झाली.
त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत सुटल्यावर विजेता संघ सुपर ओव्हरने ठरवला जातो. मात्र पहिला एकदिवसीय सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर का झाली नाही? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. त्याचं कारण आपण जाणून घेऊयात.
..म्हणून सुपर ओव्हर झाली नाही
वनडे सीरिजआधी उभयसंघात 3 सामन्यांची टी20i मालिका झाली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा टाय झाला. त्यामुळे सामन्याचा निकाला सुपर ओव्हरने लागला.
भारताने विजय मिळवला. मग आता दोन्ही संघ पण तेच आहेत, मग सुपर ओव्हर का नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सुपर ओव्हर न होण्यामागे नियम आहे. नियमानुसार, एकदिवसीय द्विपक्षीय मालिकेत सुपर ओव्हर होत नाही. अर्थात 2 संघांमध्ये होणाऱ्या वनडे सीरिजमधील सामना टाय झाल्यास तो तिथेच संपतो. त्या सामन्याला निकाल काढला जात नाही.
त्यामुळे इंडिया-श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर झाली नाही.