जामखेड न्युज——
आदर्श मुख्याध्यापक दशरथ कोपनर तर गुणवंत गणित अध्यापक प्रदिप ससाने यांना प्रदान
विविध मान्यवरांकडून अभिनंदन
जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील आणखिरीदेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चे प्राचार्य दशरथ कोपनर यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार तर विंचरणा विद्यालय पिंपरखेडचे उपक्रमशील शिक्षक प्रदिप ससाने यांना गुणवंत आदर्श गणित अध्यापक पुरस्कार देण्यात आला आहे. याबद्दल त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दशरथ कोपनर हे मुख्याध्यापक म्हणून 1997 पासून रूजू झाले काही दिवस पिंपळगाव उंडा येथे मुख्याध्यापक म्हणून सेवा केली आता ते आणखिरीदेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय फक्राबाद येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.आपल्या मुख्याध्यापक व प्राचार्य पदाच्या काळात शालेय शिस्त, वृक्षारोपण, तसेच अनेक खेळाडू घडविण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. याच कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक संघाच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात आला आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल शारदा शिक्षण प्रसारक मंडळ संगमनेर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आर. जे. गाडेकर, अध्यक्ष सुलोचना गाडेकर, चेअरमन प्रविण गाडेकर, स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्ष विश्वनाथ राऊत, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, आप्पा शिरसाठ, दत्ता काळे, शंकर खताळ, भरत लहाने, इथापे यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
तसेच विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. विंचरणा विद्यालय पिंपरखेडचे उपक्रमशील शिक्षक प्रदिप ससाने यांना गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. ससाने हे विद्यालयात गणित, विज्ञान शिकवतात त्यांच्या मुळे अनेक गुणवंत विद्यार्थी घडले आहेत. तीन वेळा इन्स्पायर अवार्ड साठी राज्य पातळीवर गेले आहेत. गणित विज्ञान प्रदर्शनात ही तालुका व जिल्हा पातळीवर बक्षिसे मिळवले आहेत. या पुरस्कारामुळे संस्थेचे अध्यक्ष दिगंबर ढवळे, सचिव भाऊसाहेब ढवळे सह मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे.
रविवार दिनांक 28 /7/2024 रोजी महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक संघाच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार श्री आणखिरीदेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय फक्राबाद चे प्राचार्य माननीय श्री कोपनर दशरथ पांडुरंग यांना आणि गुणवंत आदर्श गणित अध्यापक पुरस्कार श्री ससाने प्रदीप गौतम श्री विंचरणा माध्यमिक विद्यालय, पिंपरखेड यांना माजी संचालक टेमकर साहेब व माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस साहेब जिल्हा गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री संजय कुमार निक्रड सर यांच्या हस्ते देण्यात आला.