शासनाच्या बदली आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या नगरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अन्यथा बेमुदत उपोषण करणार – हनुमंत पाटील

0
1445

जामखेड न्युज——

शासनाच्या बदली आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या नगरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अन्यथा बेमुदत उपोषण करणार – हनुमंत पाटील

 

अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दोन वेळेस शासनाच्या बदली आदेशाचा अवमान केलेला आहे. त्यामुळे या मुजोर व दहशत पसरवणाऱ्या अधिकाऱ्याविरूद्ध शासनाने त्वरित शिस्तभंगाची कार्यवाही करावी अन्यथा त्यांच्या विरोधात दि. 5 आँगस्ट 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात साकतचे मा. सरपंच तसेच तालुका उपाध्यक्ष राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हनुमंत पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद अहमदनगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची दिनांक २१/५/२०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) यांचे स्वाक्षरीने जिल्हा परिषद ठाणे येथे बदली झाली होती. तरी पण ते बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत.

त्यानंतर परत दिनांक ०१/०७/२०२४ रोजी शासनाने त्यांची बदली अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर पालिका परिवहन पुणे येथे केली होती. ती पण अप्पर मुख्य संचिव सेवा यांचे सहीनंच केलेली होती.’महाराष्ट्र शासनाने दोन वेळेस बदली करूनही आशिष येरेकर हे बदली झालेल्या ठिकाणी हजर झाले नाहीत. तसेच त्यांनी जिल्हा अहमदनगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार अद्याप सोडलेला नाही.

त्यांनी शासनाच्या आदेशाचा एक नाही दोन वेळेस अवमान केलेला आहे. त्यामुळे त्यांनी
वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचा अवमान केलेला असून त्यांचे विरुध्द शिस्त भंगाची कार्यवाही करावी. त्यांचे कनिष्ठ अधिकाऱ्या सोबत वागणे बरोबर नाही. ते कनिष्ठ अधिका-यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात प्रत्येक अधिका-याना होपलेस, युजलेस (Hopless, useless) मूर्ख म्हणून संबोधतात.त्यांच्या पाठीमागे कोणत्यातरी बड्या राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्या शिवाय एवंढा मुजोर पणा करणार नाहीत.

शासनाच्या आदेशाला केसची टोपली दाखवतात, कनिष्ठ कर्मचाद्याला सतत त्रास देऊन, तपासणी करण्याची भीती दाखवून बडतर्फ ( सस्पेंड) करण्याची भीती दाखवून पैसे गोळा करतात. श्री येरेकर CEO यांच्या त्रासाला कंटाळून बरेच कनिष्ठ अधिकारी स्व- ईच्छा निवृती घेत आहेत, किंवा दीर्घ मुदतीच्या आजारी रजा टाकून घरीच बसत आहेत. सध्या रोजगार हमी योजनेअंतर्गत बरेच सिंचन विहिरी मंजूर आहेत. मस्टर काढणे बंद केले आहे. या सर्व विहिरी गरीब आणि मासागास्वर्गीय शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या असून त्यांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत यामुळे गरीब शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

या CEO साहेबांचा जिल्हा परिषदेत मनमानी कारभार सुरू आहे. येरेकर साहेब हे वारंवार झूम मीटिंग घेतात. त्या मीटिंगमध्ये अश्लील भाषा वापरतात. गेल्या अनेक महिन्यांपासून भीतीपोटी महिला कर्मचारी महिला अधिकारी भीतीपोटी अन्याय सहन करीत आहेत. कुचंबना सहन करत आहेत. महिलांच्या अन्न्यायला वाचा फोडून त्यांच्या वरील अन्याय दूर करावा असे निवेदनाद्वारे केली आहे.

तरी महाराष्ट्र शासनाचा दोन वेळेसच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे अशा मुजोर व दहशतवादी IAS अधिकाऱ्याविरुद्ध त्वरित शिस्तभंगाची कार्यवाही करावी अन्यथा त्यांच्याविरुद्ध दिनांक 05/08/2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे बेमुदतून अमर उपोषण करण्यात येईल. असा इशारा साकतचे मा सरपंच व तालुका उपाध्यक्ष राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हनुमंत पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here