ज्योती क्रांती पतसंस्थेचे संस्थापक अजिनाथ हजारे यांना ऑरेंज बिझनेस एक्सलन्स आयकॉन पुरस्कार प्रदान केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्ली येथे पुरस्कार प्रदान

0
405

जामखेड न्युज——

ज्योती क्रांती पतसंस्थेचे संस्थापक अजिनाथ हजारे यांना ऑरेंज बिझनेस एक्सलन्स आयकॉन पुरस्कार प्रदान

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्ली येथे पुरस्कार प्रदान

 

जामखेड तालुक्यातील जवळा येथील ज्योती क्रांती मल्टीटेस्टचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ हजारे यांना दिल्ली येथे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑरेंज बिझनेस एक्सलन्स आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामुळे जामखेडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


ऑरेंज रेडिओ यांच्या माध्यमातून दिला जाणारा ऑरेंज बिझनेस आयकॉन पुरस्कार बैंकिंग, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दिला जातो. यावर्षी ज्योती क्रांती मल्टीटेस्टचे संस्थापक अजिनाथ हजारे यांना हा पुरस्कार देण्यात आला. ज्योती क्रांती मल्टीस्टेट संस्थेच्या माध्यमातून बॅंकींग व सामाजिक क्षेत्रातील कामावरून संस्थेचे अध्यक्ष आजीनाथ हजारे यांची निवड करण्यात आली.

जामखेड तालुक्यातील जवळा या छोट्याशा गावातून ५ सप्टेंबर २००० साली अजिनाथ हजारे, दशरथ हजारे, विष्णू हजारे, मारूती रोडे या चार शिक्षकांनी ज्योती क्रांती पतसंस्थेची स्थापना केली. व्यवस्थापक किरण वर्पे यांनी स्थापनेपासून विविध कामात सहभाग घेतला. ग्रामीण भागातील संस्थेला उज्वल यश संपादन करण्यासाठी भानुदास हजारे, भानुदास रोडे, सुभाष सरोदे, राजेंद्र मोहळकर, मारुती नाळे अनिल आव्हाड, राजेंद्र हजारे, दत्ता कोल्हे, बळीराम अवसरे, कुंडलिक कोल्हे, कथले गुरुजी, किसन मेहेर अभय नाळे आदींनी योगदान दिले आहे.

त्यामुळे संस्थेची भरभराट होऊन संस्थेने शैक्षणिक, कृषी, पशुसंवर्धन, ग्रामीण विकासात काम करून सर्व सामान्य नागरीकांची नाळ जोडली गेली. ग्रामीण भागात महिला बचतगट, दुग्ध व्यवसाय तसेच शेतकऱ्यांच्या लहानसहान अडचणी लक्षात घेऊ कर्जवाटप केले यामुळे स्थापनेपासून संस्था सभासदांच्या विश्वासास पात्र ठरली आहे.

 

महाराष्ट्र राज्याबरोबर ज्योती क्रांती मल्टीस्टेट संस्थेचा विस्तार गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात ४८ शाखा आहेत. 300 कर्मचारी, 200 दैनंदिन प्रतिनिधी, 30 ग्राहक सेवा केंद्र, 5000 महिला बचत गटामार्फत 50 हजार महिलांना तसेच ५०० ते ६०० कुटुंबातील तरुणांना या मल्टीस्टेट संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

 

चौकट
आजीनाथ हजारे – अध्यक्ष ज्योती क्रांती मल्टीस्टेट संस्था

पैशांपेक्षा विश्वास मोठा आणि विश्वासापेक्षा श्रद्धा मोठी या भावनेतून श्रद्धापूर्वक अर्थसेवा या भावनेतून सेवा सुरू झाली. ग्रामीण भागात महिला बचतगट, दुग्ध व्यवसाय तसेच शेतकऱ्यांच्या लहान सहान अडचणी लक्षात घेऊ संस्थेने काम सुरू केले. यामुळे स्थापनेपासून संस्था सभासदांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. त्यामुळे या संस्थेचा राज्यभर विश्वास वाढला आहे. ठेवीदार व सभासद यांचे हित पाहून गुजरात, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यात विस्तार करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here