उत्तम आचरण व शिस्तीमुळे आयुष्याला आकार मिळतो – रमेश चांदेकर ल.ना.होशिंग विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

0
595

जामखेड न्युज——

उत्तम आचरण व शिस्तीमुळे आयुष्याला आकार मिळतो – रमेश चांदेकर

ल.ना.होशिंग विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

 

गोविंद म्हणजे ईश्वर,गुरु पिता गुरु माता व सर्वात महत्त्वाचा भाग आईचे महत्व अंधाराकडून प्रकाशाकडे नेताना प्रत्येक कष्ट स्वतः घेत आई-वडिलांनी आपल्या मुलावर केलेले संस्कार व गुरुजनांनी सांगितल्या प्रमाणे उत्तम आचरण व शिस्त हा आयुष्याला एक आकार देत असतो. त्याचबरोबर थोर पुरुषांचे कार्याचे आपण वाचन करून वाचन संस्कृती अतिशय महत्त्वाचा भाग आहे. याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन आपली प्रगती करावी व आई वडील गुरु व आपल्यापेक्षा ज्येष्ठ सर्वांचा नेहमीच आदर राखला पाहिजे असे रमेश चांदेकर यांनी सांगितले.

ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये गुरूंचा सन्मान करून त्यांच्याबद्दल आदर युक्त भावना व्यक्त करत गुरु शिष्य यांच्यातील उत्तम परंपरा दर्शवत मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा संपन्न झाली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक रमेश चौधरी,प्रमुख पाहुणे चांदेकर सर,वायकर सर व पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड,शिक्षक प्रतिनिधी श्रीमती संगीता दराडे उपस्थित होते.

सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर रमेश चांदेकर सर व शहाजी वायकर सर यांचा प्रथमता भव्य सत्कार करण्यात आला व त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षकांचाही विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थिनी साक्षी ढोले हिने गुरून बद्दल आपल्या मनोगतातून आदर व्यक्त केला.
पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड यांनी प्रास्ताविकामध्ये गुरुचे महत्व,गुरु शिष्य परंपरा व त्याचबरोबर गुरू स्थानी असलेले आपले आई-वडील यांची महती आपल्या मनोगत मधून दिली.त्याचबरोबर हिंदी अध्यापक विनोद उगले सर यांनीही कबीर यांचे दोहे देत गुरुपौर्णिमेचा हेतू व त्याबद्दल प्रती आदर आपल्या मनोगतातून सांगितले.

त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शहाजी वायकर सर विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व, काटेकोरपणा, अनेकांकडून चांगल्या गोष्टींचा संकल्प करत मला काय व्हायचं आहे याचा विचार करून त्या ध्येयप्राप्तीसाठी आपली प्रत्येक गोष्ट वर्तन,कष्ट, अभ्यास हा असावा प्रचंड कष्ट मेहनत घेण्याची तयारी असली पाहिजे.विद्यार्थी वयातच आपण एक आदर्श विद्यार्थी असले पाहिजेत अशा विद्यार्थ्यांची निश्चितच प्रगती झाल्याशिवाय राहत नाही असे मनोगत व्यक्त केले.


त्यानंतर अध्यक्षीय मनोगतामध्ये रमेश चौधरी सर यांनी देशभरामध्ये गुरुपौर्णिमा अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न होते आजही धावपळीच्या युगामध्ये ही विद्यार्थ्यांमध्ये आई-वडील व गुरु बद्दलची आदर युक्त भावना दिसते हा महत्त्वाचा भागआहे.

या कार्यक्रमासाठी समारंभ प्रमुख आदित्य देशमुख,बबनराव राठोड,विशाल पोले,रोहित घोडेस्वार,नरेंद्र डहाळे,किशोर कुलकर्णी,व दराडे संगीता,अल्हाट वंदना,घायतडक सुप्रिया,भालेराव पूजा,बांगर स्वाती,घाडगे स्वप्नाली,
रासकर प्रभा,धुमाळ सुरेखा,कारंडे रेश्मा,देविका फुटाणे,सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल देडे यांनी केले व आभार प्रदर्शन पोपट जगदाळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here