जामखेड न्युज——
शेतकरी पुत्र बाबासाहेब कडभने यांची पोलीस चालक पदी निवड
जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कडभनवाडी येथील बाबासाहेब श्रीराम कडभने यांची अहिल्यानगर पोलीस चालक पदी निवड झाली आहे याबद्दल त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बाबासाहेब कडभने याचे वडील श्रीराम कडभने शेती करतात. शेतकरी पुत्राची पोलीस पदी निवड झाल्यामुळे कडभनवाडी, साकत परिसरातून त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बाबासाहेब कडभने याचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी कडभनवाडी येथे झाले तर पाचवी ते दहावी श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे झाले. अकरावी बारावी ल. ना. होशिंग विद्यालय येथे झाले तर बी एस्सी पाटोदा येथील पीव्हीपी काॅलेज येथे झाले. तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नगर येथे बी. अँड डब्ल्यू अकॅडमी अहिल्यानगर येथे अभ्यास केला.
बाबासाहेब कडभने यांने शारीरिक मोजमाप परिक्षेत पन्नास पैकी पन्नास गुण मिळवले तसेच थेअरी पेपरला शंभर पैकी 83 गुण मिळवत ओपन कँटँगिरीमध्ये तिसरी रँक मिळवली.
बाबासाहेब कडभने याची पोलीस चालक पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडभनवाडी, ग्रामपंचायत सदस्य सचिन नेमाने व समस्त कडभनवाडी ग्रामस्थ, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश दादा आजबे, साकतचे उपसरपंच राजाभाऊ वराट, सेवा संस्थेचे संचालक गणेश वराट, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कोल्हे यांच्या सह अनेकांनी बाबासाहेब कडभने याचा सत्कार करत अभिनंदन केले आहे.