जामखेड न्युज——–
लटके वस्ती शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश, शंभर टक्के निकाल, तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत
तालुक्यातील गुणवंत शाळा तसेच शिष्यवृत्ती व नवोदय परिक्षेत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा लटकेवस्ती शाळेचा शिष्यवृत्ती परिक्षेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत. यामुळे यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले आहे.
18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) परीक्षेत जि प प्रा शाळा लटके वस्ती येथील 3 विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली.
चि. प्रसाद विकास सौने (246/298), कु. श्रेया नवनाथ आरोळे (236/298), कु. संध्या राजेंद्र पवार (230/298)यांनी परीक्षेत उज्वल यश संपादन केले.
तसेच शाळेचा 100% निकाल लागणारी तालुक्यातील एकमेव शाळा असून त्यासाठी मुख्याध्यापिका श्रीमती सीमा भोगल मॅडम व वर्गशिक्षिका श्रीमती रसिका गाढवे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, नगरचे उपशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, नायगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश मोहिते, सरपंच सौ गिरीजा ताई उतेकर, सदस्य सौ राजश्री लटके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. सोनाली लटके ,उपाध्यक्ष श्री गणेश अनभुले, शिक्षण प्रेमी श्री राजेंद्र लटके, श्री रामचंद्र लटके, श्री बापूराव पवार ,श्री अरुण लटके यांनी अभिनंदन केले.