अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची अखेर बदली

0
615

जामखेड न्युज——

अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची अखेर बदली

 

अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची नियुक्ती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित पुणे या पदावर आय ए एस संजय कोलते यांच्या जागी पद वरिष्ठ समय श्रेणीत केली आहे

मे महिन्यातच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली होती. त्यांच्या बदलीचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी (दि. २१मे ) काढले होते. पण परत तोंडी आदेशाद्वारे बदली रद्द करण्यात आली होती.

सन २०१८ चे आयएएस अधिकारी असणारे आशिष येरेकर हे ६ मे २०२२ रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रूजू झालेे होते. त्यापूर्वी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी नगरला जिल्हा परिषदेवर प्रशासन म्हणून कामकाज पाहिले.


दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपलेली नसताना व येरेकर यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना बदलीचे आदेश निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. त्यावेळी तात्पुरत्या स्वरुपात तोंडी आदेशाद्वारे बदली रद्द करण्यात आली होती.

आता मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची नियुक्ती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित पुणे या पदावर आय ए एस संजय कोलते यांच्या जागी पद वरिष्ठ समय श्रेणीत केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here