जामखेड न्युज——
नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे विजयी, विवेक कोल्हे दुसऱ्या स्थानावर
विधान परिषदेसाठी नुकत्याच पार पडलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या किशोर दराडे यांचा दणदणीत विजय झाला आहे. मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीत शिवसेनेचे किशोर दराडे, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवरा विवेक कोल्हे यांच्यात जोरदार लढत पहायला मिळाली पण अखेर दराडे यांनी विजय मिळवला.
नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूक
अंतिम फेरी आकडेवारी
1 ) किशोर दराडे 32309
2 ) विवेक कोल्हे 23465
आमदार किशोरभाऊ दराडे 8844 मतांनी विजयी घोषित
गेल्या चौवीस तासांपासून सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये शिवसेनेचे किशोर दराडे पहिल्या दोन्ही फेऱ्यांमध्ये पहिला आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडीवर होते. तर अपक्ष विवेक कोल्हे हे दुसऱ्या स्थानी राहिले.
या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांना तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक रंगतदार झाली होती.
या निवडणुकीत विजयासाठी 31576 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र कोणत्याही उमेदवाराने पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतांचा कोटा पूर्ण न केल्याने, दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी झाली. दराडे यांना विजयासाठी दुसऱ्या पसंतीच्या 5100 मतांची आवश्यकता होती. ती पूर्ण केल्यानंतर त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
राज्यातील एकूण चार जागांवर विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात निवडणूक झाली. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात बाजी मारली. तर कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांनी तिसऱ्यांदा बाजी मारात विजयाची हॅट्ट्रिक साधली. नाशिकमधून किशोर दराडे यांच्या रूपाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एका जागेवर यश आले.
📌 नाशिक विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक अपडेट 2024 – 25
एकूण मतदान – 64 हजार 853
=========================
➡️ किशोर भिकाजी दराडे : 26476
➡️ अँङ गुळवे संदीप गोपाळराव (पाटील) : -16280
➡️ ॲड महेंद्र मधुकर भावसार :131
➡️ कोल्हे विवेक बिपिनदादा: 17372
➡️ भागवत धोंडीबा गायकवाड : 9
➡️ अनिल शांताराम तेजा : 7
➡️ अमृतराव उर्फ आप्पासाहेब रामराव शिंदे : 259
➡️ इरफान मो इसहाक : -17
➡️कचरे भाऊसाहेब नारायण :1195
➡️ कोल्हे सागरदादा रविंद्र :66
➡️ कोल्हे संदीप वसंतदादा : 74
➡️ गव्हारे गजानन पंडीत : 151
➡️ गुरुळे संदिप वामनराव : 152
➡️ झगडे सचिन रमेश :107
➡️ दिलीप काशिनाथ डोंगरे: 78
➡️ आर.डी.निकम : 552
➡️ पै.डॉ.पानसरे छगन भीकाजी :10
➡️ बोठे रणजित नानासाहेब: 0
➡️ महेश भिका शिरुडे : 15
➡️ रतन राजलदास चावला : 68
➡️ संदीप गुळवे पाटील : 132
➡️ वैध मते : 63151
➡️ अवैध मते : 1702