जामखेड न्युज——
जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार दराडे कमी पडले – उपसभापती कैलास वराट
नगर जिल्हा टीडीएफ विवेक कोल्हे यांच्या बरोबर

सध्या शिक्षकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न जुनी पेन्शन योजना मिळाली असा आहे. गेले सहा वर्षे विद्यमान आमदार हा प्रश्न सोडविण्यासाठी कमी पडले आहेत. असे सर्व सामान्य शिक्षकांचे मत आहे. शिक्षकांचा प्रतिनिधी निवडताना शिक्षकांविषयी आत्मीयता असणारे विवेक कोल्हे आहेत. तसेच कोल्हे यांच्या रूपाने नगर जिल्ह्याला संधी मिळणार आहे. विवेक कोल्हे आमदार होणार आहेतच भविष्यात ते शिक्षणमंत्री होणार आहेत. शिक्षकांविषयी आत्मियता असणारे कोल्हे हे सक्षम उमेदवार कोल्हे हेच आहेत. असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी व्यक्त केले.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या निमित्ताने जामखेड येथे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या वतीने भव्य शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी गणेश कारखान्याचे संचालक बाळासाहेब चोळके पाटील, महेंद्र गोरडे पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कैलास वराट, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, जामखेड महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुनील नरके, प्राचार्य बी. के मडके, प्राचार्य दिलीप ढवळे, अरूण पिंपरे, तुळशीराम भोजने, नागरगोजे सर, जाकीर शेख, प्रमोद आहेर, संजय हजारे सर, प्रा. कैलासराव वायकर, विनोद सासवडकर, रत्नपारखी सर, जोरे सर, प्रा. युवराज भोसले, विधाते सर, प्रा. अविनाश फलके, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार, विंचरणा विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकरराव खताळ, मयुर भोसले यांच्या सह अनेक मान्यवर व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात म्हणाले की, नगर जिल्ह्यासाठी सुवर्ण संधी आपल्या कडे आहे. विवेक कोल्हे मोठे व्हिजन असणारे नेते आहेत. दूरदृष्टी असणारे आहेत. त्यांची तिसरी पिढी राजकारणात काम करत आहे. फक्त शिक्षक जुन्या पेन्शन पासून दूर ठेवले बाकी विभागात दिली आहे. यावेळी विद्यमान आमदार काय करत होते.तुमच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी विवेक कोल्हे सक्षम उमेदवार आहेत. राजकारण, शिक्षण, समाजकारण यात राज्याला आदर्श असे काम कोल्हे यांचे आहे. भुमीपुत्राला साथ देयची आहे. तुमच्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी माझी आहे. मी विवेक कोल्हे यांच्या माध्यमातून सोडविणारच असे अमोल राळेभात यांनी सांगितले.

यावेळी बोलताना उपप्राचार्य डॉ. सुनील नरके म्हणाले की, नगर जिल्ह्याला प्रतिनिधित्व हवे आहे. माणूस कामाचा आहे शिक्षकांच्या प्रश्नांविषयी तळमळ असणारे विवेक कोल्हे आहेत. त्यांनी जामखेड तालुक्यातील अनेक मुलांना शैक्षणिक मदत केली आहे. शिक्षण क्षेत्रात सध्या खुपच भयावह अवस्था आहे. जामखेड महाविद्यालयात 43 जागा आहेत पण कार्यरत 17 जण आहेत. शिक्षक आमदारांनी प्रभावी पणे सरकार कडून पदे भरण्याची परवानगी घेतली पाहिजे.

टीडीएफचे पदाधिकारी दिलीप ढवळे म्हणाले की,
नगर जिल्हा टीडीएफचा एकमुखी पाठिंबा विवेक कोल्हे यांना दिलेला आहे. जुन्या पेशन्स साठी कोल्हे प्रयत्न करणार आहेत. टीडीएफने कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिलेला नाही अपक्ष उमेदवार कोल्हे यांना पाठिंबा दिलेला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गांधी सर यांनी केले ते म्हणाले की, माणूस कामाचा मित्र हक्काचा, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान संजिवनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मोठे काम 1400 सामुदायिक विवाह मोफत, हजारो महिलांना रोजगार उपलब्ध, युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार सर्वच क्षेत्रात कोल्हे यांचे भरीव काम आहे.
कार्यक्रमाचे आभार प्राचार्य बी के मडके यांनी मानले.






