जामखेड न्युज——
शिक्षकांच्या प्रश्नांला न्याय देण्याचे काम दराडे यांनी केले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

किशोर दराडे यांनी शिक्षकांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिक्षक मतदारसंघातून आमदार होण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षात त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत अनेक प्रश्न उपस्थित केले. लोकसभा निवडणुकीत चुकीच्या गोष्टी पसरवून विरोधकांनी डाव साधला. मात्र आपल्याला आता गाफील राहून चालणार नाही. तुमच्या प्रश्नांना न्याय देणाऱ्या उमेदवाराला तुम्हाला पुन्हा निवडून द्यावे लागेल, असे आवाहन यासमयी केले.

नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ.किशोर दराडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ लोणी येथे शिक्षक मतदार, संस्था चालक आणि महायुतीचे पदाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. शिक्षकांचा आत्मसन्मान आणि मान वाढविण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी महायुतीचे सरकार निश्चित प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माणसाच्या आयुष्यात आई वडीलांनंतर महत्व हे त्याच्या शिक्षकाला असते. त्यामुळे शिक्षकांना उतरत्या वयात सुरक्षित वाटावे यासाठी आम्ही त्यांना जुनी पेन्शन योजना मंजूर करून दिली. यापुढे देखील शिक्षकांचे सर्व प्रश्न सरकारच्या माध्यमातून नक्की सोडवू अशी ग्वाही दिली.

अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील प्रवरा नगर येथे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास उपस्थित राहून दराडे यांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. प्रवरानगरमधील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक, मुख्याध्यापक या मेळाव्याला उपस्थित होते.

यावेळी महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे, महायुतीचे उमेदवार किशोर दराडे, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि प्रवरा नगर मधील शैक्षणिक संस्थांचे संचालक, मुख्याध्यापक व शिक्षक आवर्जून उपस्थित होते.


