लोकसभा निवडणुकीत जामखेड शहरात लंकेंना मताधिक्य तर साकत गणात विखेंना

0
1253

जामखेड न्युज——

लोकसभा निवडणुकीत जामखेड शहरात लंकेंना मताधिक्य तर साकत गणात विखेंना

लोकसभा निवडणुक म्हणजे विधानसभेची रंगित तालीम ठरणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात निलेश लंके यांना 104936 मते तर सुजय विखे यांना 95835 मते मिळाली यात लंके यांनी 9128 मतांची आघाडी घेतली. यामुळे आमदार राम शिंदे यांच्या साठी ही धोक्याची घंटा आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासाठी महत्त्वाची निवडणुक होती लोकसभेला कोण मताधिक्य देणार यानुसार विधानसभेला काय होते हे पाहणे महत्त्वाचे आहे. ज्यांना लोकसभेला मताधिक्य त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. जामखेड शहरात निलेश लंके यांनी मताधिक्य घेतले आहे तर साकत गणात डॉ सुजय विखे यांनी मताधिक्य घेतले आहे.

जामखेड शहरातील 23 मतदान केंद्रात निलेश लंके यांना 7522 मते तर विखे यांना 6182 मते मिळाली आहेत यात निलेश लंके यांना 1341 मतांचे मताधिक्य आहे.

साकत गणाचा विचार केला तर
मोहा गावात निलेश लंके यांना 434 मते तर विखे यांना 926 मते येथे विखे यांना 492 मतांचे मताधिक्य आहे.

पिंपळवाडी लंके 275 तर विखे 183 यात लंके यांना 92 मतांचे मताधिक्य
कोल्हे वाडी लंके 330 तर विखे यांना 151 यात लंके यांना 179 मतांचे मताधिक्य
साकत मध्ये लंके यांना 944 मते तर विखे यांना 717 मते यात लंके यांना 227 मतांचे मताधिक्य
पिंपळवाडी, कोल्हेवाडी, साकत येथे लंके यांना 498 मतांचे मताधिक्य आहे.

सावरगाव येथे लंके 405 तर विखे यांना 263 यात लंके यांना 142 मतांचे मताधिक्य
शिऊर येथे लंके यांना 523 मते तर विखे यांना 643 मते यात विखे यांना 119 मतांचे मताधिक्य
फाळकेवाडी लंके यांना 192 तर विखे यांना 177 मते लंके यांना 15 मतांचे मताधिक्य
देवदैठण येथे लंके यांना 520 तर विखे यांना 323 मते लंके यांना 197 मतांचे मताधिक्य आहे. 
धामणगाव येथे लंके यांना 475 मते तर विखे यांना 542 मते विखे यांना 67 मतांचे मताधिक्य

माळेवाडी येथे लंके यांना 168 मते तर विखे यांना 252 मते विखे यांना 84 मतांचे मताधिक्य
दिघोळ येथे लंके यांना 422 मते तर विखे यांना 902 मते विखे यांना 480 मतांचे मताधिक्य

जायभायवाडी येथे लंके यांना 62 तर विखे यांना 629 मते यात विखे यांना 567 मतांचे मताधिक्य
तेलंगशी येथे लंके यांना 337 तर विखे यांना 883 मते मिळाली यात विखे यांना 546 मतांचे मताधिक्य मिळाले

नाहुली येथे लंके यांना 321 तर विखे यांना 301 मते मिळाली यात 20 मतांची लंकेंना मताधिक्य
नायगाव येथे लंके यांना 617 मते तर विखे यांना 641 मते मिळाली यात विखे यांना 24 मतांचे मताधिक्य
मोहरी येथे लंके यांना 236 मते तर विखे यांना 444 मते विखे यांना 206 मतांचे मताधिक्य जातेगाव येथे लंके यांना 519 मते तर विखे यांना 346 मते मिळाली यात लंके यांना 173 मतांचे मताधिक्य मिळाले

अशा प्रकारे जामखेड शहरात लंके यांना 1341 मतांचे मताधिक्य आहे. तर साकत गणाचा विचार केला तर साकत गणात विखे यांना 1479 मतांचे मताधिक्य आहे.

महाराष्ट्रातील हाय होल्टेज मतदारसंघ म्हणून नगर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. महायुतीकडून डॉ. सुजय विखे तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके उमेदवार होते. मतमोजणी वेळी कधी विखे तर कधी लंके मताधिक्य कमी जास्त होत होते. एकुण मतदान 1325477 ( तेरा लाख पंचवीस हजार चारशे सत्याहत्तर) झाले होते. एकुण पंचवीस व नोटा एक असे 26 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात 28929 मताधिक्य घेत निलेश लंके विजयी झाले आहेत.

कर्जत जामखेड, श्रीगोंदे व पारनेर विधानसभा मतदारसंघात निलेश लंके यांनी आघाडी घेतली तर अहमदनगर शहर, शेवगाव पाथर्डी व राहुरी विधानसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील आघाडीवर होते. पारनेर, श्रीगोंदा व कर्जत जामखेड ने निलेश लंके यांना साथ दिली तर अहमदनगर शहर, राहुरी व शेवगाव पाथर्डी या तालुक्यानी विखेला साथ दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here