नाशिक शिक्षक मतदार संघात 40 उमेदवारांचे 53 नामनिर्देशन पत्र दाखल 12 जून रोजी चित्र स्पष्ट होणार

0
360

जामखेड न्युज——

नाशिक शिक्षक मतदार संघात 40 उमेदवारांचे 53 नामनिर्देशन पत्र दाखल

12 जून रोजी चित्र स्पष्ट होणार

 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दि. जून ,2024 रोजी 31 उमेदवारांनी 27 नामनिर्देशन पत्र सादर केले असून आत्तापर्यंत 40 उमेदवारांनी 53 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.


अर्ज भरण्याची ७ जून ही शेवटची
तारीख होती. तर अर्ज माघार घेण्याची तारीख १२ जून रोजी आहे. २६ जूनला मतदान होणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
नाशिक पदवीधर मतदारसंघात 26 जूनला मतदान होणार असून मतमोजणी ही १ जुलैला होणार आहे. यामध्ये

जिल्हानिहाय मतदार
डिसेंबर २०२३ मध्ये प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार
नाशिक जिल्ह्यात २३ हजार ५९७,
धुळे जिल्ह्यात ८०८८,
जळगाव १३ हजार ५६,
नंदुरबार ५४१९ आणि
नगर जिल्ह्यात १४ हजार ६४२ याप्रमाणे एकूण ६४ हजार ८०२ मतदारांची नोंदणी झाली आहे. नव्याने ५५३९ मतदार नोंदणी अर्ज प्राप्त झाले. हे अर्ज मंजूर झाल्यास मतदारांची एकूण संख्या ७० हजारावर जाण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारसंख्या १६ हजारांनी वाढणार आहे.

नाशिक विभागात 64 हजार 802 मतदार
एकूण मतदार आहेत. शिक्षक, सकाळी सात ते सहा या वेळेत मतदान होणार आहे. सहाय्यक
निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी असतील.


आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये दराडे रुपेश लक्ष्मण, नाशिक यांनी अपक्ष मधून नामनिर्देशन अर्ज सादर केला आहे. गांगुर्डे बाबासाहेब संभाजी, अहमदनगर यांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक सेल संघटनेतून नामनिर्देशन अर्ज सादर केला आहे. गुळवे संदिप नामदेव, अहमदनगर, अनिल शांताराम तेजा, नाशिक, कोल्हे सागर रविंद्र, नाशिक, अमोल बाळासाहेब दराडे, अहमदनगर, रखमाजी निवृत्ती भड, नाशिक, कोल्हे संदिप वसंत, नाशिक, भास्कर तानाजी भामरे, नाशिक यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे.


धनराज देविदास विसपुते, रायगड यांनी भारतीय जनता पार्टी व अपक्षतून अर्ज सादर केला आहे. भागवत धोंडीबा गायकवाड, अहमदनगर यांनी समता पार्टीतून नामनिर्देश अर्ज सादर केला आहे. गुळवे संदिप भिमाशंकर, धुळे यांनी अपक्षतून अर्ज सादर केला आहे. पंडीत सुनिल पांडुरंग, अहमदनगर यांनी अपक्ष व भारतीय जनता पार्टीतून अर्ज सादर केला आहे. गुळवे संदीप गोपाळराव यांनी शिवसेना पक्ष (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व अपक्ष मधून अर्ज सादर केला आहे. जायभाये कुंडलिक दगडू, अहमदनगर , अविनाश महादू माळी, नंदूरबार यांनी अपक्षातून अर्ज सादर केला आहे. कचरे भाऊसाहेब नारायण, अहमदनगर यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस मधून अर्ज सादर केला आहे.

इरफान मो इसहाक, नाशिक यांनी अपक्षतून अर्ज सादर केला आहे. दिलीप बापुराव पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून अर्ज सादर केला आहे. बोठे रणजित नानासाहेब, अहमदनगर, सारांश महेंद्र भावसार,धुळे, गुरुळे संदिप वामनराव,अहमदनगर यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. दराडे किशोर भिकाजी, नाशिक यांनी शिवसेना पक्षातून अर्ज सादर केला आहे. झगडे सचिन रमेश,अहमदनगर, महेश भिका शिरुडे, नाशिक, शेख मुख्तार अहमद यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. दराडे किशोर प्रभाकर, नाशिक यांनी अपक्ष व राष्ट्रीय जनक्रांती पार्टीतून अर्ज सादर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here