बीडमध्ये हायहोल्टेज ड्रामा! राज्यातील सर्वात रोमहर्षक लढतीत शेवटच्या फेरीपर्यंत थरार बजरंग सोनवणे सात हजार मतांनी विजयी

0
1638

जामखेड न्युज ——-

बीडमध्ये हायहोल्टेज ड्रामा! राज्यातील सर्वात रोमहर्षक लढतीत शेवटच्या फेरीपर्यंत थरार

बजरंग सोनवणे सात हजार मतांनी विजयी

शेवटच्या फेरीत पंकजा मुंडे यांचा ९०० मतांनी पराभव झाल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे. यासंदर्भात अद्याप घोषणा बाकी आहे. तोच पंकजा मुंडे यांनी पुन्हा फेर मतमोजणीची मागणी केली होती तीन तासांनी बजरंग सोनवणे यांना सात हजार मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

राज्यातील सर्वात रोहहर्षक व उत्कंठावर्धक लढतबीड लोकसभा मतदारसंघात झाली. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे व शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात क्रिकेटमधील सुपर ओव्हारलाही लाजवेल असा थरार पाहायला मिळाला. आज मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत बीडमध्ये चुरस पाहायला मिळाली. कोण जिंकेल हे शेवटच्या फेरीपर्यंत सांगता येत नव्हते. शेवटच्या फेरीत पंकजा मुंडे यांचा ९०० मतांनी पराभव झाल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे. यासंदर्भात अद्याप घोषणा बाकी आहे. तोच पंकजा मुंडे यांनी पुन्हा फेर मतमोजणीची मागणी केली आहे.

 

दरम्यान शरद पवारांनी ट्विट करत बीज जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हणत महासंचालकांना परिस्थितीवर नजर ठेवण्याचे आवाहन केले आहे. पवार यांनी ट्विट केले आहे की, बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे सत्वर लक्ष पुरवावे.


पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या बजरंग सोनवणे यांची आघाडी ३० व्या फेरीपर्यंत कायम राहिली.त्यानंतर पंकजा मुंडेंनी बजरंग सोनवणेंची आघाडी तोडून तब्बल ४३ हजारांची आघाडी घेतली होती. मात्र, ३१ व्या फेरीत पुन्हा पंकजा मुंडेंचा लीड कमी होऊन बजरंग सोनवणेंनी आघाडी घेतली. पंकजा मुडेंचा लीड कमी होऊन शेवटच्या काही फेरीत हे मताधिक्य केवळ ७००० मतांवर येऊन पोहोचलं होतं.

त्यामुळे, राज्यात सर्वात थरारक आणि उमेदवारांच्या काळजाचे ठोके चुकवणारी ही लढत ठरली आहे. ३१ व्या फेरीत बजरंग सोनवणेंनी आघाडी घेतल्यामुळे शेवटच्या म्हणजेच ३२ व्या मतमोजणीकडे सर्वांचे लागले होते. ३१ व्या फेरीअखेर बजरंग सोनवणे ६८८ मतांनी आघाडीवर पोहोचले होते. शेवटच्या फेरीत सोनवणे आघाडीवर होते पण पंकजा मुंडे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. यातच बीड मध्ये खुपच गोंधळ झाला अशा बातम्या बाहेर आल्या तीन तासांनी निकाल जाहीर करत बजरंग सोनवणे यांना सात हजार मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here