जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय पोषण आहार शिजवण्याचे साहीत्य अज्ञात चोरटय़ाने चोरून नेले होते. हि फिर्याद मुख्याध्यापकांनी दाखल केल्यानंतर जामखेड पोलीसांनी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने चक्रे फिरवत बारा तासात चोरट्यांला जेरबंद करत चोरून नेलेला माल हस्तगत केला आहे. जामखेड पोलीसांच्या तत्परतेमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.दि. ८ रोजी रात्री किंवा ९ रोजी पहाटे कोणीतरी अज्ञात चोरट्याने जिल्हा परिषद सेमी इंग्रजी मराठी मुले, जामखेड या शाळेच्या स्वयंपाकगृहाचे कुलुप तोडून आत प्रवेश करुनपाच हजार रुपये किमतीचे अॅल्युमिनियमचे दोन मोठे पातेले व झाकण तसेच एक हजार रुपये किमतीचे लहान दोन पातेले व झाकण २५० रूपये किमतीची स्टीलची बादली असे ६२५० रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेले होते. तशी फिर्याद मुख्याध्यापक गणपत जगन्नाथ चव्हाण यांनी दाखल केली होती. सदर गुन्ह्याचे अनूशंगाने पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी भोस, पोलिस कॉन्स्टेबल राहूल हिंगसे, मुक्तार कुरेशी यांनी शोध घेवून आरोपी चंद्रकांत भागूजी काळे वय २५ वर्ष रा. गोरोबा टाँकीजचे पाठीमागे, जामखेड ता.जामखेड यांचेकडे गून्हयातील चोरी केलेला माल मिळून आल्याने तो जप्त केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.पोलीसांच्या तत्परतेमुळे जामखेड पोलीसांचे अभिनंदन होत आहे.