जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
बकरी ईद सण शासनाच्या नियमांचे पालन करून शांततेत साजरी करावी, ईदची नमाज सार्वजनिक ईदगाह मैदानावर अदा न करता आपापल्या घरी करावी, कुर्बानी ही प्रतिकात्मक पद्धतीने करावी जनावरे आॅनलाईन पद्धतीने खरेदी करावीत कारण बाजार कुठेही भरणार नाहीत. ईद साजरी करताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर वापरावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरू व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत केले.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी ईदच्या पाश्र्वभूमीवर मुस्लिम समाजातील धर्मगुरू व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी धर्मगुरू मौलाना खलील अहमद, अझरुद्दीन काझी, मुक्तार सय्यद, शामीर सय्यद, हुसेन मुल्ला, जमीर सय्यद, नासीर सय्यद (गादीवाले ) हजर होते.
यावेळी मुस्लिम समाजातील धर्मगुरू व लोकप्रतिनिधींनी आम्ही समाजातील सर्व लोकांना शासनाने घातलेल्या कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगू कोणीही नियमांचे उल्लंघन करणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ असे आश्वासन समाजाच्या वतीने धर्मगुरू व लोकप्रतिनिधींनी दिले.
समाजातील काही बदमाश लोक खोट्या अफवा पसरतात समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशा बदमाश लोकांवर जामखेड पोलीस लक्ष ठेवून आहेत. जर कोणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांचा बंदोबस्त करू असे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले.