सारोळ्यातील तरूणाकडून मुलीचा विनयभंग जामखेड पोलीस स्टेशनला पोक्सोचा गुन्हा दाखल, आरोपीस अटक

0
4221

जामखेड न्युज——

सारोळ्यातील तरूणाकडून मुलीचा विनयभंग, जामखेड पोलीस स्टेशनला पोक्सोचा गुन्हा दाखल, आरोपीस अटक

 

सुट्टी मध्ये मामाच्या गावी आजीकडे जामखेड तालुक्यातील सारोळा येथे असताना आजी शेतात गेलेली असताना मी एकटी घरी असल्याच्या संधीचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने घरात घुसून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्ये केले तसेच तु माझ्या बरोबर लग्न केले नाही तर मी फाशी घेईल तेव्हा मी आरडाओरडा केला आजी समोरच्या दरवाजातून येत आहे हे दिसताच आरोपी तरूण मागील दरवाजातून पळून गेला. रात्री जामखेड पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रविण इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल देवा पळसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ शेकडे, पोलीस चालक आरसुळ यांनी आरोपी अविनाश रामदास सगळे यास अटक केली आहे.

जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत पिडीत मुलीने म्हटले आहे की, उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे मी मामाच्या गावी सारोळा येथे आजीकडे आलेली असताना दि. २३ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आजी शेतात गेलेली असताना मी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत आजीच्या शेजारी असणारा अविनाश रामदास सगळे वय २२ रा. सारोळा हा जबरदस्तीने घरात घुसून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्ये केले तसेच तु माझ्या बरोबर लग्न केले नाही तर मी फाशी घेईल तेव्हा मी आरडाओरडा केला आजी समोरच्या दरवाजातून येत आहे हे दिसताच आरोपी अविनाश रामदास सगळे हा मागील दरवाजातून पळून गेला अशी फिर्याद पिडीत मुलीने जामखेड पोलीस स्टेशनला दिली आहे.

आरोपी अविनाश रामदास सगळे विरोधात भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३५४ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अल्पवयीन असल्यामुळे आरोपी विरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास स्वत: पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here