बारावीच्या निकालात जामखेडचा जिल्ह्यात दुसरा क्रमांक तालुक्याचा निकाल ९५.४७

0
449

जामखेड न्युज——

बारावीच्या निकालात जामखेडचा जिल्ह्यात दुसरा क्रमांक

तालुक्याचा निकाल ९५.४७

 

शैक्षणिक दृष्ट्या मागास व काँपीचे माहेरघर अशी ओळख असणारे जामखेड आता गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक दृष्ट्या जिल्ह्यात अव्वल येत आहे. शिष्यवृत्ती परिक्षेत तालुक्याने आपला चांगला ठसा निर्माण केला आता बारावी परीक्षेतही विद्यार्थ्यांमध्ये आनंद दायी व काँपीमुक्त भयमुक्त वातावरणात परीक्षा संपन्न झाल्या याचा प्रत्यय निकालात दिसून आला आहे. तालुक्याचा निकाल ९५.४७ टक्के लागला असून जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा मंगळवारी जाहीर झाला .यामध्ये जामखेड तालुक्याचा निकाल ९५. ४७ टक्के लागला असून शेवगांव तालुक्याचा निकाल ९५. ६२ टक्के लागला आहे .


शेवगाव तालूक्यानंतर जामखेड तालुक्याचा सर्वांधिक निकाल लागला असून नगर जिल्ह्यात जामखेड तालुका दुसऱ्या स्थानी आहे. अनेक शाळांचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे. 


फेब्रुवारी/मार्च २०२४ ला बारावी ची परीक्षा कॉपी मुक्त व अतिशय आनंदी वातावरण घेण्यात आली. गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांनी स्वतः परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षा कॉपीमुक्त व तणावमुक्त वातावरणात कशी होईल यासाठी प्रयत्न केले होते. व त्याचे फळ काल जाहीर झालेल्या निकालातून दिसून आले.


सर्व गुणवंत व यशस्वी विदयार्थ्याचे जामखेड तालुक्याचे तहसिलदार गणेश माळी, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलिस निरीक्षक महेश पाटील, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे , सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here