Friday, February 13, 2026
Home राजकारण जामखेड तालुक्यातून निलेश लंकेंना सर्वाधिक मताधिक्य देणार – सरपंच अंजली ढेपे

जामखेड तालुक्यातून निलेश लंकेंना सर्वाधिक मताधिक्य देणार – सरपंच अंजली ढेपे

0
279

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यातून निलेश लंकेंना सर्वाधिक मताधिक्य देणार – सरपंच अंजली ढेपे

 

भाजपा सरकारने सामान्य माणसांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. दहा वर्षांत देशाला महागाई, बेरोजगारी च्या खाईत लोटले आहे. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात विखेंच्या बलाढ्य शक्तीला निलेश लंकेंची जनशक्ती भारी ठरणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांना जामखेड तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देणार असे गुरेवाडी, महारूळीच्या सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष अंजली ढेपे यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

महागाई मुळे महिला परेशान आहेत घरगुती गॅसच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. सुशिक्षीत बेरोजगाराच्या हाताला काम नाही प्रचंड बेरोजगारी आहे. विद्यमान खासदाराचे मतदारसंघात काहीही काम नाही. ते कोणाला भेटत नाहीत. आपले उमेदवार सर्वसामान्य आहेत. लोकांच्या सुख दु:खात आघाडीवर असतात. तरूण वर्गात त्यांची प्रचंड क्रेझ आहे. आम्ही जामखेड तालुक्यातून निलेश लंके यांना सर्वाधिक मताधिक्य देणार आहोत.

समोरच्या उमेदवाराने पाच वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळात काय काम केेले ? किती फिरले ? किती वेळा मतदारसंघात आले ? कोणते प्रश्‍न सोडविले? त्यांनी काहीच काम केले नाही. मोठयाचं पोरगं आहे, पैसा भरपूर आहे, सत्तेची ताकद आहे म्हणून खासदार व्हायचंय ! यापेक्षा कोणतीही गुणवत्ता त्यांच्याकडे नाही ही वस्तूस्थिती असल्याचे ढेपे यांनी सांगितले.

लोकांचे प्रश्‍न सोडविता सोडविता नीलेश लंके आमदार झाले. कोरोना संकटात राज्यात, देशात भयानक परिस्थिती होती. कोणी एकमेकांच्या जवळ जात नव्हते. अशा वेळी लंके यांनी कोरोना रूग्णांसाठी कोव्हीड सेंटर सुरू केले. हजारो रूग्णांना जीवदान दिले. रूग्णांजवळ बसून त्यांना धीर दिला. हे धाडस लंके हेच करू शकतात. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याची ओढ त्यांच्याकडे असून एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून मोठी लोकप्रियता त्यांनी मिळविली आहे.


निलेश लंके यांच्या उमेदवारीमुळे तरूणांमध्ये स्फुर्ती पहावयास मिळत आहे. कोठेही गेले तरी हजारो लोक त्यांच्या स्वागताला उपस्थित असतात. त्यामुळे लंके यांचा विजय मोठा होणार आहे. तालुक्यात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागलेली आहेत त्यामुळे लंके यांना जामखेड तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!