जामखेड न्युज——
प्रा. बाळासाहेब कोल्हे यांची विद्यार्थ्यांप्रती तळमळ वाखाणण्याजोगी – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. कोल्हे यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न
प्रा. बाळासाहेब कोल्हे यांचे काम विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांप्रती त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. त्याचाच परिणाम आज या प्रसंगी त्यांचे अनेक माजी विद्यार्थी उपस्थित आहेत. व ते वेगवेगळ्या पदावर काम करतात. ग्रामीण भागातही चांगले काम केल्यानंतर नामवंत विद्यार्थी तयार होतात याचे श्रेय प्रा. कोल्हे यांनाच जाते.
प्रा. बाळासाहेब कोल्हे यांचा सेवापूर्ती समारंभ मंगळवार दि.30 एप्रिल रोजी ल. ना. होशिंग माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी अनेक गुणवंत विद्यार्थी, त्याचबरोबर पालक, ग्रामस्थ, नातेवाईक, मित्र, तसेच दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उद्धवरावजी देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेचे अध्यक्ष, सुनील दुधाडे, उपाध्यक्ष अरुण शेठजी चिंतामणी, सचिव शशिकांतजी देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेशजी मोरे संचालिका संगीताताई देशमुख व सर्व संचालक मंडळ, उद्योजक त्रिंबक कुमटकर, जामखेड तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष मुकुंद सातपुते आणि राणीताई लंके जि.प.सदस्या अहमदनगर, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पारखे, पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड, मुख्याध्यापक रमेश अडसूळ, दत्ता काळे, श्रीधर जगदाळे, जामखेड महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रा.सुनील नरके, त्याचबरोबर या संस्थेतील निवृत्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सुरुवातीला दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या वतीने प्राध्यापक श्री. बाळासाहेब कोल्हे सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
प्राध्यापक बाळासाहेब कोल्हे सर यांनी 4 सप्टेंबर 1991 ला या संस्थेत नोकरीला सुरुवात केली व 31 में 2024 रोजी ते सेवा निवृत्त होत असून त्यांची या संस्थेत 33 वर्षे सेवा पूर्ण झाली.
या प्रसंगी कोल्हे सरांची कन्या सौ. अबोली सागर नवले व जावई सागर नवले यांनीही भावनिक होऊन आपले मनोगत व्यक्त केले , तसेच कोल्हे सरांचे माजी विद्यार्थी श्री. सुर्यकांत ढवळे सर, श्री. सुनील वाघमारे सर , जामखेडचे पोस्ट मास्तर श्री. बळी जायभाय,व सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलास हजारे या सर्व माजी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर प्राध्यापक श्री. रमेश चौधरी सर, प्राध्यापक श्री. कोहक सर, पर्यवेक्षक श्री. प्रवीण गायकवाड सर यांनीही
आपले मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य श्री. श्रीकांत होशिंग यांनी आपल्या मनोगतामध्ये प्राध्यापक बाळासाहेब कोल्हे यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम करून अनेक नामवंत विद्यार्थी घडवले भूगोल विषयासाठी विशेष परिश्रम घेत त्यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. नवीन प्राध्यापकांसाठी त्यांचे काम आदर्शवत आहे असे मनोगत व्यक्त केले.
या शुभेच्छा निरोप समारंभ प्रसंगी लोणी हवेली ग्रामस्थांच्या वतीने पारनेर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. सुनील दुधाडे सरांनी प्रा. बाळासाहेब कोल्हे सरांच्या जिवनपटाबद्दल अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख यांनी प्राध्यापक बाळासाहेब कोल्हे यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून पुढील काळासाठी त्यांना यशमय, मंगलमय, आरोग्यमय शुभेच्छा व्यक्त केल्या.
या सुंदर अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे सर व प्राध्यापिका पोकळे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन जेष्ठ प्राध्यापक सादिक शेख सर यांनी केले.