श्री साकेश्वर यात्रेला उत्साहात सुरूवात, विविध मान्यवरांची उपस्थिती, उद्या होणार भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

0
800

जामखेड न्युज——

श्री साकेश्वर यात्रेला उत्साहात सुरूवात, विविध मान्यवरांची उपस्थिती, उद्या होणार भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

 

श्री साकेश्वर महाराज यात्रा उत्सवानिमित्त कावडीधारकांची भव्य दिव्य अशी प्रसिद्ध बँन्ड पथकासह मिरवणूक काढत देवाला गंगेच्या पाण्याने अभिषेक घालण्यात आला यावेळी गावातील तसेच पाहुणे राऊळे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता शेरणी वाटप तसेच रात्री देवाची पालखी व उद्या भव्य दिव्य असे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे.

प्रति पंढरपुर म्हणून साकत गावाची परिसरात ख्याती आहे. श्री साकेश्वर महाराज हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. साकतची यात्रा व हगामा हा परिसरातील लोकांसाठी मोठा कुतुहलाचा विषय असतो. देवाला अभिषेक घालण्यासाठी शनीचे राक्षसभुवन येथून गोदावरी नदीचे पाणी घेऊन शेकडो कावडीधारक अनवाणी पायांनी पाणी आणतात.

पायी चालत जाऊन व चालत येत पाणी आणतात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. लेझीम पथक, बँन्ड पथकासह जलाभिषेक करणू नंतर चार वाजता शेरणी वाटप झाली. सायंकाळी नृत्यांगनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील लोकांची मोठी गर्दी केली होती. रात्री बारा वाजता देवाची पालखी संपूर्ण गावात फिरवली. पालखीपुढे देवाचा नंदी दिमाखात चालत होता. गावातील लहान थोर मंडळींनी देवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.


गावात विठ्ठल रूक्मीनी मंदीर असुन या ठिकाणी गेल्या 69 वर्षापासून अखंड विनावादन व नंदादीप तेवत आहे. यामुळे परिसरातील लोक साकतला प्रति पंढरपुर म्हणून ओळखतात. गावच्या यात्रेसाठी गावातील नोकरी धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेले सर्व लोकांनी यात्रेसाठी हजेरी लावतात.

श्री साकेश्वर यात्रा उत्सवानिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान उद्या मंगळवारी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र चॅम्पियन पै. मनोज माने विरूद्ध महाराष्ट्र चँपियन पै. कालिचरण सोनलकर यांची एक नंबरची कुस्ती राहिल यासाठी अनिलजी वराट डायरेक्टर धारा गृप कंपनी इंदोर यांच्या तर्फे 1,11,069 रूपये व श्रीराम घोडेस्वार यांच्या तर्फे मानाची गदा देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांक पै. लौकिक सुर्वे विरूद्ध पै. रामा कांबळे, तृतीय क्रमांक पै. संदीप लटके विरूद्ध पै. अभिजीत भोसले, तसेच पै. संजय तनपुरे विरूद्ध पै. बबलू सुतार, चौथी कुस्ती पै. उमेश शिंदे विरूद्ध पै. पृथ्वीराज वनवे यासह अनेक मान्यवर मल्लांच्या कुस्त्या होणार आहेत. स्थळ जिल्हा परिषद शाळा साकत असणार आहे तरी कुस्ती शौकीनांनी डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या मैदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

चौकट

श्री साकेश्वर महाराज यात्रेनिमित्त दर्शनासाठी
आमदार प्रा. राम शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरूमकर, सोमनाथ राळेभात, राहुल राऊत, प्रा. अरूण वराट, युवराज मुरूमकर, नागराज मुरूमकर, भरत लहाने, सागर मुरूमकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिवसभर अनेक भाविक भक्तांनी हजेरी लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here