जामखेड न्युज——
सैनिकावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार, आष्टी परिसरात शोककळा
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यांतील नांदा गावचे भुमीपुत्र शहिद विष्णु रघुनाथ औटे (६६ आर्मड रेजिमेंट) हवालदार (वय ४४) जम्मु काश्मिर, कोलकत्ता, बंगलोर, राजस्थान, हरियाणा देशात विविध ठिकाणी २४ वर्ष सेवा केली,आजाराने कमांडो हॉस्पिटल पुणे येथे २६/०४/२०२४ रोजी वीरमरण आले.
भारत मातेच्या वीर सुपुत्रास भावपुर्ण श्रद्धांजली देण्यात आली. शुक्रवारी संध्याकाळी माहिती धडकताच नांदा गांवासह संपूर्ण पंचक्रोशी शोक सागरात बुडाली,आष्टी तालुक्यांत नांदा गावातील भुमीपुत्र विष्णु रघुनाथ औटे हे सन २००१ मध्ये आर्मी भरती झाले होते.नांदा गावचा सुपुत्र शहीद झाल्याचे समजताच औटे परिवारांसह पंचक्रोंशीवर शोककळा पसरली होती.
यांच्या घरी पोहोचले,त्यांनी शहीद कुटुंबियांचे सांत्वन केले,या जवानाचे पार्थिंव शनिवारी संध्याकाळी नांदा गावांत पोहोचल्यानंतर आष्टी तालुक्यातील व नांदा गावांतील आजी-माजी सैनिक तसेच सर्व नांदा आमदार,माजी आमदार,त्रिदल सेवा संघ,महसुल विभाग. जि.प.सदस्य, पं,स,सदस्य, ग्रामस्थ, पोलीस पाटील,सरपंच उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, सर्वच माता बहिणींनी भारत माता की जय,अमर रहे अमर रहे विष्णु औटे अमर रहे! जड अंतकरणाने घोषणा दिल्या.
त्यानंतर सजवलेल्या लष्करी वाहनांतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यानंतर शहीद जवान विष्णु औटे यांना बीड जिल्हा पोलीस प्रशासनाकडूंन तसेच लष्करी विभागाकडूंन अखेरची मानवंदना देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,मुलगा,भाऊ,आई असा परिवार आहे.