फोटोग्राफर दादा कलासागर यांचे निधन, जामखेड परिसरात शोककळा

0
1716

जामखेड न्युज——

फोटोग्राफर दादा कलासागर यांचे निधन, जामखेड परिसरात शोककळा

 

जामखेड येथील प्रसिद्ध फोटोग्राफर सुनिल उर्फ (दादा) कलासागर कासार वय ४५ यांचे रात्री अचानक निधन झाल्याने जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे.

 

लोकसभा निवडणुक कामासाठी छायाचित्रन करत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने ताबडतोब समर्थ हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले रात्री ११ वाजेच्या सुमारास निधन झाले.

लोकसभा निवडणूक छायाचित्रणासाठी गेले असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आल़े मात्र, उपचारादरम्यानच सुनिल उर्फ दादा (कलासागर) कासार यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील असा परिवार आहे.

 

रविवारी दुपारी एक वाजता शहरातील तपनेश्वर येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. सुनिल हे प्रेमळ व मोठ्या मनाचा माणूस म्हणून तालुक्यात ख्याती असलेले व एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांच्या निधनाने छायाचित्रण क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. परिसरात शोककळा पसरली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here